DC vs RR Live Score, IPL 2021 : दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी विजय, प्लेऑफचं तिकीट पक्कं

DC vs RR Live Score in Marathi: गुणतालिकेत पाचव्या स्थानवर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा मुकाबला दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्लीशी होत आहे. टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी राजस्थानसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

DC vs RR Live Score, IPL 2021 : दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी विजय, प्लेऑफचं तिकीट पक्कं

आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी सोपा विजय मिळवला आहे. या विजयासाह दिल्लीने गुणतालिकेत 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तसेच प्लेऑफचं तिकीटदेखील कन्फर्म केलं आहे.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलेलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. परिणामी राजस्थानचा संघ या सामन्यात निर्धारित 20 षटकात 121 धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे राजस्थानला 33 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 25 Sep 2021 19:04 PM (IST)

  राजस्थानचं शतक

  18 व्या शटकात तबरेज शम्सीने एक धाव घेत धावफलकावर राजस्थानचं शतक झळकावलं आहे. राजस्थानला अद्याप विजयासाठी 12 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे.

 • 25 Sep 2021 19:01 PM (IST)

  राजस्थान पुन्हा अडचणीत, राहुल तेवतिया 9 धावांवर बाद

  img

  राजस्थान रॉयल्सने सहावी विकेट गमावली आहे. नॉखियाने तेवतियाला शिम्रन हेटमायरकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 99/6)

 • 25 Sep 2021 18:56 PM (IST)

  सॅमसनची अर्धशतकी खेळी, राजस्थानचं आव्हान अद्याप जिवंत

  39 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने संजू सॅमसनने 50 धावा चोपल्या आहेत. राजस्थान रॉयल्सनेदेखील शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे.

 • 25 Sep 2021 18:32 PM (IST)

  राजस्थानचा पाचवा झटका, रियान पराग 2 धावांवर बाद

  img

  अवघ्या 55 धावांत राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. अक्षर पटेलने रियान परागला 2 धावांवर असताना त्रिफळाजित केलं.

 • 25 Sep 2021 18:30 PM (IST)

  राजस्थानचं अर्धशतक

  img

  12 व्या षटकात रियान परागने एक धाव घेत धावफलकावर राजस्थानचं अर्धशतक झळकावलं. त्यापुढच्या चेंडूवर संजू सॅमसनने शानदार चौकार वसूल करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. (राजस्थान 24/4)

 • 25 Sep 2021 18:28 PM (IST)

  राजस्थानला चौथा धक्का, महिपाल लोम्रोर माघारी

  img

  राजस्थान रॉयल्सने चौथी विकेट गमावली आहे. कगिसो रबाडाने महिपाल लोम्रोरला 19 धावांवर असताना आवेश खानकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 48/4)

 • 25 Sep 2021 18:02 PM (IST)

  राजस्थानला तिसरा झटका, डेव्हिड मिलर 7 धावांवर बाद

  img

  राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने डेव्हिड मिलरला 7 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी यष्टीचित केलं. (राजस्थान 17/3)

 • 25 Sep 2021 17:52 PM (IST)

  राजस्थानला दुसरा धक्का, सलामीवीर जयस्वाल 5 धावांवर बाद

  img

  राजस्थान रॉयल्सने दुसरी विकेट गमावली आहे. नॉखियाने सलामीवीर जयस्वालला 5 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 6/2)

 • 25 Sep 2021 17:43 PM (IST)

  पहिल्याच षटकात राजस्थानला मोठा झटका, सलामीवीर लिविंगस्टोन माघारी

  img

  पहिल्याच षटकात राजस्थानने सलामीवीर लियाम लिविंगस्टोनची (1) विकेट गमावली आहे. आवेश खानने त्याला यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (राजस्थान 6/1)

 • 25 Sep 2021 17:39 PM (IST)

  राजस्थानचे सलामीवीर मैदानात

  155 धावांचे लक्ष्य घेऊन राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि लियाम लिविंगस्टोन मैदानात

 • 25 Sep 2021 17:13 PM (IST)

  दिलीचा 6 वा गडी माघारी, अक्षर पटेल बाद

  img

  चेतन साकरीयाने अक्षर पटेलला 12 धावांवर असताना डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 142/6)

 • 25 Sep 2021 17:01 PM (IST)

  दिल्लीचा पाचवा झटका, आक्रमक शिम्रन हेटमायर 28 धावांवर बाद

  img

  दिल्लीने पाटवी विकेट गमावली आहे. मुस्तफिजूर रहमानने आक्रमक शिम्रन हेटमायर 28 धावांवर बाद करत राजस्थानला मोठं यश मिळवून दिलं आहे. (दिल्ली 121/5)

 • 25 Sep 2021 16:55 PM (IST)

  दिल्लीचं शतक

  img

  15 व्या षटकात शिमरन हेटमायरने चेतन साकरीयाच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल करत धावफलकावर दिल्लीचं शतक झळकावलं आहे. (दिल्ली 104/4)

 • 25 Sep 2021 16:42 PM (IST)

  दिल्लीचा चौथा फलंदाज माघारी, श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद

  img

  दिल्लीचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे, राहुल तेवतियाने श्रेयस अय्यरला 43 धावांवर असताना यष्टीचित केलं. (दिल्ली 90/4)

 • 25 Sep 2021 16:33 PM (IST)

  दिल्लीला तिसरा झटका, कर्णधार रिषभ पंत 24 धावांवर बाद

  img

  दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत 24 धावांवर असताना मुस्तफिजूर रहमानने त्याला त्रिफळाचित करुन राजस्थानला तिसरं यश मिळवून दिलं. (83/3)

 • 25 Sep 2021 16:14 PM (IST)

  दिल्लीचं अर्धशतक

  सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रिषभ पंत (12) आणि श्रेयस अय्यरने (17) संयमी खेळ खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. 8.1 षटकात दिल्लीने अर्धशतकी मजल मारली आहे.

 • 25 Sep 2021 15:53 PM (IST)

  दिल्लीला दुसरा झटका, पृथ्वी शॉ 10 धावांवर बाद

  img

  दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. चेतन साकरीयाने पृथ्वी शॉला (10) लिविंगस्टोनकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 21/2)

 • 25 Sep 2021 15:48 PM (IST)

  राजस्थानला पहिलं यश, सलामीवीर शिखर धवन 8 धावांवर बाद

  img

  राजस्थानला पहिलं यश मिळालं आहे. कार्तिग त्यागीने सलामीवीर शिखर धवन 8 धावांवर असताना त्रिफळाचित केलं आहे. (दिल्ली 18/1)

 • 25 Sep 2021 15:33 PM (IST)

  दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ-शिखर धवन मैदानात

  दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात दाखल झाले आहेत. तर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी मुस्तफिजूर रहमानकडे चेंडू सोपवला आहे.

 • 25 Sep 2021 15:29 PM (IST)

  नाणेफक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI