T20 World Cup 2021: ग्रुप स्टेजमधून 4 संघ पुढील फेरीत, जाणून घ्या सुपर 12 मध्ये कुठला संघ कोणत्या गटात?

टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीच्या सामन्यांना शनिवारपासून (23 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. 8 संघ आधीपासून सुपर 12 मध्ये असताना आता 4 नवीन संघ ग्रुप स्टेजमधून सुपर 12 मध्ये गेले आहेत.

1/5
टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) ग्रुप स्टेजचे सामने अखेर संपले आहेत. श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स (Sri lanka vs Netharlands) यांच्यातील सामन्याने ग्रुप स्टेजच्या सामन्याची सांगता झाली. आता आजपासून (23 ऑक्टोबर) सुपर 12 चे सामने सुरु होणार आहेत. सुपर 12 मध्ये आधी 8 संघ असताना आणखी 4 संघ ग्रुप स्टेजमधून सुपर 12 मध्ये गेले आहेत. हे संघ आहेत बांग्लादेश, स्कॉटलंड, नामिबिया आणि श्रीलंका. यातील स्कॉटलंड आणि नामीबिया हे संघ भारत असणाऱ्या गटात गेले आहेत.

2/5
सर्वात आधी सुपर 12 मध्ये गेलेला संघ बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. बांग्लादेशला स्कॉटलंडने पहिल्या सामन्यात मात दिल्यानंतर त्यांनी एकही सामना हारले नाहीत. ओमान आणि पापुआ न्यू  गिनिया संघाना पराभूत करत बांग्लेदेशने सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे.

3/5
स्कॉटलंडने त्यांच्या गटात सर्वांत अप्रतिम कामगिरी करत तीनही सामने जिंकले. बांग्लादेश,  ओमान आणि पापुआ न्यू  गिनिया या तीनही संघाना पराभूत करत सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे.

4/5
नामीबिया संघाने अगदी ऐतिहासिक कामगिरी करत यंदा सुपर 12 मध्ये प्रथमच स्थान मिळवलं आहे. त्यांनी आधी नेदरलँड्स आणि नंतर आयर्लंड संघाला मात देत  सुपर 12 मध्ये स्थान मिळवला आहे.

5/5
सर्वात शेवटी सुपर 12 मध्ये स्थान मिळवलेले श्रीलंका संघाने संपूर्ण ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यांनी तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी नामिबीया, आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघाना पराभूत करत सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI