India vs Australia Score and Updates, 2nd T20i : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात 4 गडी राखून भारताला नमवलं
India vs Australia Score and Highlights Updates In Marathi, 2nd T20i : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने मिचेल मार्श याच्या नेतृत्वात 126 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्यांचं आयोजन हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं. उभयसंघातील पहिला सामना हा पावसामुळे पूर्ण झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे चाहत्यांना दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा होती. ऑस्ट्लेलियाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. एकूण 9 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या जोडीने निर्णायक अर्धशतकी भागीदारी करत भारताची लाज राखली. अभिषेक 68 आणि हर्षित राणा याने केलेल्या 35 धावांमुळे भारताला ऑलआऊट 125 पर्यंत पोहचता आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 126 धावांचं आव्हान हे 13.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताचा हा मेलबर्नमधील दुसरा टी 20i पराभव ठरला. उभयसंघातील तिसरा सामना हा 2 नोव्हेंबरला होणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात 4 गडी राखून भारताला नमवलं, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
भारताने विजयासाठी दिलेलं 125 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून पूर्ण केलं. या विजयासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने 18.4 षटकात सर्व गडी गमवून 125 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या 14 व्या षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. आता तिसऱ्या टी20 सामन्यात भारताला काहीही करून कमबॅक करणं गरजेचं आहे. अन्यथा मालिका वाचवणं खूपच कठीण होईल.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी धक्का
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या दोन धावांची गरज असताना सलग दोन विकेट गमावले. जसप्रीत बुमराहने मिचेल ओवननंतर शॉर्टला क्लिन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहला हॅटट्रीकची संधी होती. पण तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली नाही.
-
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, विजयासाठी फक्त 2 धावांची गरज
ऑस्ट्रेलियाला मिचेल ओवनच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असताना त्याची विकेट पडली. जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: टीम डेव्हीड 1 रनवर ढेर, वरुणने काढली विकेट
वरुण चक्रवर्ती याने टीम डेव्हीड याला 1 रनवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. वरुणने आपल्याच बॉलिंगवर टीम डेव्हीडला कॅच आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: कुलदीपकडून मिचेल मार्शची शिकार, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका
कुलदीप यादव याने आपली पहिली विकेट मिळवत ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला आहे. कुलदीपने कॅप्टन मिचेल मार्श याला आऊट करत अर्धशतक करण्यापासून रोखलं आहे. कुलदीपने मार्शला 46 रन्सवर अभिषेक शर्माच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
-
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: तिलक वर्माचा कडक कॅच, ट्रेव्हिस हेड आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिला झटका
वरुण चक्रवर्ती याने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला आहे. वरुणने ट्रेव्हिस हेड याला आऊट केलं आहे. तिलक वर्मा याने बाउंड्री लाईवर हेडचा रिले कॅच घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हेडने 15 बॉलमध्ये 28 रन्स केल्या.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 29 रन्स
ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 126 रन्सचा पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये बिनबाद 29 धावा जोडल्या आहेत.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात, मार्श-हेड मैदानात, विजयासाठी 126 रन्सचं टार्गेट
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्लेलियाकडून कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. भारताने कांगारुंसमोर विजयासाठी 126 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: टीम इंडिया 125 रन्सवर ऑलआऊट, 20 ओव्हर खेळण्यात अपयशी
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 20 ओव्हरआधीच ऑलआऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 18.4 ओव्हरमध्ये 125 रन्सवर ऑलआऊट केलं. भारतासाठी अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने 68 तर हर्षित राणा याने 35 रन्स केल्या.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: भारताला नववा झटका, अभिषेक शर्मा आऊट
ऑस्ट्रेलियाने भारताला नववा आणि मोठा झटका दिला आहे. अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेक शर्मा याने 37 बॉलमध्ये 68 रन्स केल्या.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: शिवम दुबे स्वस्तात आऊट, टीम इंडियाला सातवा झटका
हर्षित राणा आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबे याच्याकडून फटकेबाजी अपेक्षित होती. मात्र शिवमला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शिवम 4 रन्सवर आऊट झाला. त्यांनतर कुलदीप यादव याला भोपळाही फोडता आला नाही.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: हर्षितच्या चाबूक खेळीचा शेवट, भारताला सहावा झटका
भारताने 49 धावांवर 5 विकेट गमावल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा याची साथ देण्यासाठी हर्षित राणा मैदानात आला. हर्षितने अभिषेकला कडक साथ देत जोरदार फटकेबाजी केली. हर्षितने या संधीचा चांगला फायदा घेत भारताला 100 पार पोहचवण्यात निर्णायक योगदान दिलं. हर्षितला अर्धशतकाची संधी होती. मात्र हर्षित आऊट झाला. हर्षितने 33 बॉलमध्ये 35 रन्स केल्या.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: अभिषेक शर्माचं अर्धशतक, टीम इंडियाचा डाव सावरला
अभिषेक शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक करत टीम इंडियाचा डाव सावरला आहे. हर्षितचं हे टी 20i कारकीर्दीतील सहावं आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचं पहिलं अर्धशतक ठरलं.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: टीम इंडिया अडचणीत, अभिषेक शर्मावर मदार
टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी दुसऱ्या टी 20i सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आहेत. भारताने 10 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 69 रन्स केल्या आहेत. ओपनर अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा खेळत आहे. अभिषेक सेट आहे. त्यामुळे अभिषेककडून भारताला अनेक आशा आहेत.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: अक्षर पटेल रन आऊट, भारताला पाचवा झटका, 50 धावांच्या आतच अर्धा संघ माघारी
आधीच टीम इंडिया अडचणीत होती. ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने 4 झटके दिले होते. त्यामुळे भारताला मोठ्या भागीदारीची गरज होती. अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल ही जोडी सेट होत होती. मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अक्षर स्ट्राईक एंडला रन आऊट झाला. भारताने 49 रन्सवर पाचवी विकेट गमावली.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: जोश हेझलवूडचा भारताला दणका, तिलक वर्मा डक, टीम इंडियाचे 4 फलंदाज माघारी
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने भारताला दणका दिला आहे. हेझलवूड याने तिलक वर्मा याने झिरोवर आऊट केलं आहे. अशाप्रकारे भारताने चौथी विकेट गमावली आहे. भारताची स्थिती 4.5 ओव्हरमध्ये 32 वर 4 आऊट अशी झाली आहे.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: भारताला तिसरा झटका, कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट
टीम इंडियाची एमसीजीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यामध्ये निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारताने झटपट तिसरी विकेट गमावली आहे. शुबमन गिल, संजू सॅमसन याच्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. कॅप्टन सूर्या 1 रनवर आऊट झाला.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: भारताचा प्रयोग फसला, संजू समॅसन आऊट, भारताला दुसरा झटका
ऑस्ट्रेलियाने भारताला दुसरा झटका दिला आहे. कॅप्टन सूर्य़कुमार यादव याला तिसऱ्या स्थानी पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला आहे. संजू सॅमसन अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 3.3 ओव्हरनंतर 2 आऊट 23 असा झाला आहे.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: टीम इंडियाला पहिला झटका, शुबमन गिल आऊट
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. भारताचा उपकर्णधार शुबमन गिल आऊट झाला आहे. जोश हेझलवूड याने टीम इंडियाच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शुबमनला कॅप्टन मिचेल मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 5 धावा केल्या.
-
AUS vs IND 2nd T20i Live Score: सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, अभिषेक-शुबमन सलामी जोडी मैदानात
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
वणी-चंद्रपूर महामार्गवर भीषण अपघात, तीनजण ठार, दोघेजण गंभीर जखमी
वतमाळच्या वणी-चंद्रपूर महामार्गवर लालगुडा जवळ भीषण अपघात झाला असून यात तीनजण ठार झाले, दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात वणीच्या लालगुडा परिसरात झाला. स्कोडा कार व ट्रकचा यात हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने चंद्रपूर येते उपचाराकरिता हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वणी ट्राफिक घटनास्थळी दाखल झाले. स्कोडा वाहनांमध्ये 5 ते 6 प्रवास करीत होते. मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश असून मृतकांची अद्याप ओळख पटली नाही.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, झेव्हीयर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन आणि जोश हेझलवुड.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव(कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील दुसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया
टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम
टी 20i सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीरपर), टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस आणि तनवीर संघा.
-
AUS vs IND 2nd T20i Live Updates : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20i सामना
उभयसंघात टी 20i मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे निकाली निघाला नाही. सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. आता मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे. मेलबर्नमध्ये पावसाने खोडा न घातल्यास चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल.
Published On - Oct 31,2025 1:09 PM
