AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE T20 WC Highlights And Score : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय

| Updated on: Jun 05, 2024 | 11:18 PM
Share

India vs Ireland, T20 world Cup 2024 Highlights and Score In Marathi: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप मोहिमेत टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला आहे.

IND vs IRE T20 WC Highlights And Score : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय
india vs ireland icc t20 world cup 2024 live

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 8 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड आमनेसामने होते. टीम इंडियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 97 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 12.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 52 धावा केल्या. ऋषभ पंतने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्स जोडल्या. विराट 1 तर सूर्यकुमारने 2 धावा केल्या.  तर आयर्लंडकडून मार्क एडेअर आणि बेंजामिन व्हाईट या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2024 11:11 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडियाचा शानदार विजय

    टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. रोहितने  52 धावांची खेळी केली.  तर पंतने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्स केल्या.  पंतने रिव्हर्स स्कूप मारत टीम इंडियाला विजयी केलं.  तर आयर्लंडकडून बेंजामिन व्हाईट आणि मार्क एडेअर या दोघांनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाने या विजयासह ए ग्रुपमध्ये यूएसएला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

  • 05 Jun 2024 10:39 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: रोहित शर्मा आऊट न होता माघारी

    रोहित शर्माने आयर्लंड विरुद्ध अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतर अर्धशतकानंतर रोहित आऊट न होता मैदानाबाहेर गेला. रोहित रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

  • 05 Jun 2024 10:28 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडियाची विजयाच्या दिशेने वाटचाल

    टीम इंडियाने 97 धावांचा पाठलाग करताना 9 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 64 धावा केल्या आहेत.  टीम इंडियाला विजयासाठी 66 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. रोहित शर्मा 42 आणि ऋषभ पंत 17 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर विराट कोहली 1 रन करुन आऊट झाला.

  • 05 Jun 2024 09:59 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडियाला पहिला धक्का, विराट कोहली स्वसतात आऊट

    टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. 97 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची अनपेक्षित सुरुवात झाली. विराट कोहली अवघी 1 धाव करुन कॅच आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची स्कोअर 2.4 ओव्हरमध्ये 1 बाद 22 असा झाला आहे.

  • 05 Jun 2024 09:46 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडियाची सलामी जोडी मैदानात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी सलामीला आली आहे.  टीम इंडियाला विजयासाठी 97 धावांचं आव्हान मिळालं आहे.

  • 05 Jun 2024 09:26 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: आयर्लंडचं 96 धावांवर पॅकअप

    टीम इंडियाने आयर्लंडला अवघ्या 96 धावांवर गुंडाळलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी 97 धावा करायच्या आहेत.

  • 05 Jun 2024 09:04 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: आयर्लंडला आठवा धक्का

    अक्षर पटेल याने आपल्या बॉलिंगवर अप्रतिम कॅच घेत आयर्लंडला आठवा धक्का दिला आहे. बॅरी मॅककार्थी याला भोपळाही फोडता आला नाही.

  • 05 Jun 2024 08:59 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: मार्क एडायर आऊट

    आयर्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदांजासमोर गुडघे टेकले आहेत. आयर्लंडने सातवी विकेट गमावली आहे. मार्क एडायर 3 धावा करुन कॅच आऊट झाला. शिवम दुबेने एडायरची हार्दिक पंड्याच्या बॉलिंगवर कॅच घेतली.

  • 05 Jun 2024 08:55 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: जॉर्ज डॉकरेल आऊट

    मोहम्मद सिराज याने जॉज डॉकरेल याला आऊट केलं आहे. सिराजने जसप्रीत बुमराह याच्या हाती जॉर्ज डॉकरेलला झेलबाद केलं. जॉर्ज डॉकरेलने 5 बॉलमध्ये 3 धावा केल्या.

  • 05 Jun 2024 08:52 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: कर्टिस कॅम्फर आऊट

    हार्दिक पंड्या याने कर्टिस कॅम्फर याला विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. कर्टिस कॅम्फर याने 8 बॉलमध्ये 12 धावा केल्या.  हार्दिकची ही दुसरी विकेट ठरली.

  • 05 Jun 2024 08:47 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: हॅरी टेक्टर माघारी

    जसप्रीत बुमराह याने आयर्लंडला चौथा धक्का आपल्या विकेटचं खातं उघडलं आहे.  बुमराहने हॅरी टेक्टर याला 4 धावांवर आऊट केलं आहे.

  • 05 Jun 2024 08:40 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: लॉर्कन टकर आऊट, आयर्लंडला तिसरा धक्का

    टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याने आयर्लंडला तिसरा धक्का देत आपली पहिली विकेट घेतली आहे. हार्दिकने लॉर्कन टकर याने 13 बॉलमध्ये 10 धावा केल्या.

  • 05 Jun 2024 08:23 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: आयर्लंडला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    अर्शदीप सिंह याने आयर्लंडला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत टीम इंडियाला जोरदार सुरुवात करुन दिली आहे. अर्शदीपने आयर्लंडच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन पॉल स्टर्लिंग आणि त्यानंतर अँड्रयू बालबर्नी या दोघांना आऊट केलं.

  • 05 Jun 2024 08:13 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: कॅप्टन पॉल स्टर्लिंग आऊट

    टीम इंडियाने आयर्लंडला पहिला धक्का दिला आहे. अर्शदीप सिंह याने आयर्लंडचा कॅप्टन पॉल स्टर्लिंग याला विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. स्टर्लिंगने 6 बॉलमध्ये 2 धावा केल्या.

  • 05 Jun 2024 08:02 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: सामन्याला सुरुवात

    टीम इंडिया-आयर्लंड सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. आयर्लंडकडून कॅप्टन पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 05 Jun 2024 07:43 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन

    आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

  • 05 Jun 2024 07:43 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

  • 05 Jun 2024 07:42 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडियाचा टॉस जिंकूुन फिल्डिंगचा निर्णय

    टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 05 Jun 2024 07:17 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: आयर्लंड टीम

    आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

  • 05 Jun 2024 07:16 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: टीम इंडिया

    टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 05 Jun 2024 07:13 PM (IST)

    IND vs IRE T20 WC Live Updates: सामन्याला 8 वाजता सुरुवात होणार

    टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Published On - Jun 05,2024 7:12 PM

Follow us
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.