IND vs WI, 1st T20, LIVE Cricket Score: पहिली टी 20 भारताने जिंकली, मालिकेत 1-0 अशी आघाडी

India vs West Indies 1st T20 Live Cricket Score and Updates in Marathi: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज टी-20 सीरीजमधला पहिला सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.

IND vs WI, 1st T20, LIVE Cricket Score: पहिली टी 20 भारताने जिंकली, मालिकेत 1-0 अशी आघाडी

| Edited By: सागर जोशी

Feb 16, 2022 | 11:06 PM

INDIA vs WEST INDIES, 1st T20, LIVE Cricket Score: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज टी-20 सीरीजमधला पहिला सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ टी 20 मध्येही तशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. दुखापतगस्त असल्यामुळे केएल राहुल या मालिकेत खेळत नाहीय. त्याच्याजागी ऋषभ पंतचं प्रमोशन झालं असून तो उपकर्णधार आहे.

Key Events

भारताने नाणेफेक जिंकली

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-वेस्ट इंडिजमध्ये टी 20 सीरीज

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्याच्या टी 20 सीरीजला आजपासून सुरुवात होतेय.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 16 Feb 2022 10:50 PM (IST)

  पहिला टी 20 सामना भारताने जिंकला

  वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला टी 20 सामना भारताने सहा विकेट राखून जिंकला. वेंकटेश अय्यरने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

 • 16 Feb 2022 10:40 PM (IST)

  सूर्यकुमार यादवचा शानदार चौकार आणि षटकार

  सूर्यकुमार यादवचा शानदार चौकार आणि षटकार. 17 षटकात भारताच्या चार बाद 139 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 26 आणि वेंकटेश अय्यरची 10 जोडी मैदानात आहे.

 • 16 Feb 2022 10:13 PM (IST)

  भारताला तिसरा धक्का, विराट कोहली बाद

  भारताला तिसरा धक्का बसला आहे. विराट कोहली 17 धावांवर आऊट झाला. एलेनने त्याला पोलार्डकरवी झेलबाद केले. भारताच्या तीन बाद 99 धावा झाल्या आहेत.

 • 16 Feb 2022 10:10 PM (IST)

  इशान किशन बाद

  भारताला 93 धावांवर दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर इशान किशन 35 धावांवर बाद झाला. 42 चेंडूत 35 धावा करताना त्याने चार चौकार लगावले.

 • 16 Feb 2022 10:01 PM (IST)

  भारताच्या एकबाद 80 धावा

  भारताच्या 10 षटकात एक बाद 80 धावा झाल्या आहेत. इशान किशन 30 आणि विराट कोहली आठ धावांवर खेळतोय.

 • 16 Feb 2022 09:50 PM (IST)

  कॅप्टन रोहित शर्मा मोठा फटका खेळताना आऊट

  दमदार फलंदाजी करणारा रोहित शर्मा रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद. रोहित शर्माने 19 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने चार चौकार आणि तीन षटकार लगावले. भारताच्या आठ षटकात एक बाद 65 धावा झाल्या आहेत.

 • 16 Feb 2022 09:34 PM (IST)

  रोहित शर्माची जबरदस्त फटकेबाजी

  कॅप्टन रोहित शर्मा जबरदस्त फलंदाजी करत आहे. भारताच्या चार षटकात 44 धावा झाल्या आहेत. रोहितने 13 चेंडूत 34 धावा करताना तीन चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत

 • 16 Feb 2022 09:20 PM (IST)

  रोहित शर्माचा शानदार षटकार

  भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. भारताच्या दोन षटकात बिनबाद 11 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानावर आहे.

 • 16 Feb 2022 09:02 PM (IST)

  भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य

  पहिल्या वनडेत भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य आहे. वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात सात बाद 157 धावा केल्या. पोलार्ड 24 धावांवर नाबाद राहिला. हर्षल पटेल, रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतला.

 • 16 Feb 2022 08:55 PM (IST)

  वेस्ट इंडिजच्या सहाबाद 147 धावा

  वेस्ट इंडिजच्या 19 षटकात सहा बाद 147 धावा झाल्या आहेत. दमदार फलंदाजी करणारा निकोलस पूरन हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 61 धावांवर बाद झाला.

 • 16 Feb 2022 08:40 PM (IST)

  वेस्ट इंडिजच्या 125 धावा

  वेस्ट इंडिजच्या 17 षटकात पाच बाद 125 धावा झाल्या आहेत. पूरन 54 आणि पोलार्ड सहा धावांवर खेळतोय.

 • 16 Feb 2022 08:37 PM (IST)

  पूरनचं अर्धशतक पूर्ण

  निकोलस पूरनने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर षटकार आणि चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं आहे. तो 54 धावांवर आहे. अर्धशतकी खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले.

 • 16 Feb 2022 08:35 PM (IST)

  वेस्ट इंडिजने ओलांडला 100 धावांचा टप्पा

  वेस्ट इंडिजच्या 16 षटकात पाच बाद 108 धावा झाल्या आहेत. निकोलस पूरन 43 आणि कायरन पोलार्ड एका धावेवर खेळतोय.

 • 16 Feb 2022 08:23 PM (IST)

  वेस्ट इंडिजला पाचवा धक्का

  वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला आहे. अकील हुसेनला 10 धावांवर दीपक चहरने स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. वेस्ट इंडिजच्या 14 षटकात पाच बाद 94 धावा झाल्या आहेत.

 • 16 Feb 2022 08:09 PM (IST)

  रवी बिष्नोईची जबरदस्त गोलंदाजी

  डेब्यु मॅचमध्ये रवी बिष्नोईने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेलला त्याने दोन धावांवर वेंकटेशन अय्यरकरवी झेलबाद केले. वेस्ट इंडिजच्या 11 षटकात चार बाद 77 धावा झाल्या आहेत.

 • 16 Feb 2022 08:05 PM (IST)

  रवी बिष्नोईला मिळाली पहिली विकेट

  टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रवी बिष्नोईला पहिला विकेट मिळाला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या रॉस्टन चेसला चार धावांवर पायचीत पकडलं. वेस्ट इंडिजच्या तीन बाद 72 धावा झाल्या आहेत.

 • 16 Feb 2022 07:57 PM (IST)

  वेस्ट इंडिजच्या दोन बाद 71 धावा

  दहा षटकात वेस्ट इंडिजच्या दोन बाद 71 धावा झाल्या आहेत. निकोलस पूरन 27 आणि रॉस्टन चेस चार धावांवर खेळतोय.

 • 16 Feb 2022 07:46 PM (IST)

  रवी बिष्नोईचं पहिलं षटक

  टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रवी बिष्नोईने पहिल्या षटकात चार धावा दिल्या.

 • 16 Feb 2022 07:39 PM (IST)

  भारताला दुसर यश

  भारताला दुसर यश मिळालं आहे. जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या कायल मेयर्सला युजवेंद्र चहलने पायचीत पकडलं. 24 चेंडूत 31 धावांच्या खेळीत त्याने सात चौकार लगावले.

 • 16 Feb 2022 07:32 PM (IST)

  सहा षटकात एक बाद 44 धावा

  वेस्ट इंडिजच्या सहा षटकात एकबाद 44 धावा झाल्या आहेत. कायली मेयर्स जबरदस्त फलंदाजी करत असून तो 31 धावांवर नाबाद आहे. पूरनला त्याला साथ देतोय.

 • 16 Feb 2022 07:22 PM (IST)

  वेस्ट इंडिजच्या एक बाद 25 धावा

  चार षटकात वेस्ट इंडिजच्या एक बाद 25 धावा झाल्या आहेत. कायल मेयर्स 13 आणि निकोलस पूरन सात धावांवर खेळतोय. त्याने दीपक चहरला षटकार लगावला.

 • 16 Feb 2022 07:13 PM (IST)

  वेस्ट इंडिजला पहिला झटका

  दोन षटकांचा खेळ झाला असून वेस्ट इंडिजच्या एक बाद 12 धावा झाल्या आहेत. सलामीवर ब्रँडन किंग चार धावांवर आऊट झाला. भुवनेश्वर कुमारने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

 • 16 Feb 2022 06:54 PM (IST)

  अशी आहे भारताची प्लेइंग इलेवन

  भारताची प्लेइंग इलेवन – इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपर चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल

Published On - Feb 16,2022 6:52 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें