एकदिवसीय क्रिकेटमधील 13 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन-विराटमध्ये कोण वरचढ?, पाहा आकडेवारी

भारतीयासांठी क्रिकेट म्हणजे केवळ एक खेळ नसून प्रेम आहे. भारताकडे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत किंवा होेऊन गेले आहेत. पण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे भारतातच काय तर जगभरातील अव्वल फलंदाज आहेत.

1/5
आजच्याच दिवशी पण 13 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) नामक एका खेळाडूने भारतीय संघात पदार्पण केलं. अंडर 19 विश्वचषक जिंकवून दिला असला तरी वरिष्ठ संघात खेळणं तसं कठीणचं. पण आपल्या क्लासिक फलंदाजीने भलेभले रेकॉर्ड मागे टाकणाऱ्या विराटने आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 वर्षे पूर्ण केली. पण या 13 वर्षांत अनेकदा विराटची महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) तुलना करण्यात आली आहे.

2/5
मूळात सचिन आणि विराट हे दोघेही आपआपल्या ठिकाणी दिग्गज असल्याने त्यांची तुलना करणे अयोग्यच. पण तरी 13 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर दोघांची आकडेवारी काय म्हणतेय यावर एक नजर टाकुयाच...

3/5
विराटने 19 वर्षाच्या वयात श्रीलंका संघाविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर सचिनने 16 व्या वर्षी पाकिस्तान संघाविरुद्ध भारतीय टीममध्ये प्रवेश मिळवला होता. विशेष म्हणजे दोघांनी 18 तारखेदिवसीच आपला पहिला सामना खेळला होता. सचिनने 18 डिसेंबर, 1989 रोजी तर विराटने 18 ऑगस्ट 2008 रोजी पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

4/5
सचिन आणि विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष पूर्ण केली असता सचिनने 291 तर विराटने 245 सामने खेळले होते. ज्यामध्ये सचिनच्या तुलनेत कमी सामने खेळत विराटने 12 हजार 169 धावा केल्या आहेत. तर सचिनने 11 हजार 544 धावा आपल्या नावावर केल्या होत्या.

5/5
सचिन आणि विराट यांच्या धावा जमा करण्याच्या सरासरीचा विचार करता विराटच सरस ठरतो. विराटने 59.07 च्या सरासरीने तर सचिनने 44.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दोघांमध्ये शतकांचा आणि अर्धशतकांचा विचार करता सचिनच्या नावावर 33 शतकं आणि 56 अर्धशतकं आहेत. तर विराटच्या नावावर 43 शतकं आणि 62 अर्धशतकं आहेत. यामध्ये सचिनचा त्यावेळी सर्वोच्च स्कोर नाबाद 186 होता, पुढे जाऊन सचिनने एका सामन्यात नाबाद 200 धावा केल्या. तर विराटचा विचार करता अद्यापही त्याचा सर्वोच्च स्कोर 183 आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI