IPL Retention 2026 Updates and Highlights : एकूण 10 फ्रँचायजींकडून किती खेळाडू रिलीज? टीमनुसार जाणून घ्या
IPL 2026 Released and Retained List Updates And Highlights : आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी रिटेन्शन यादी जाहीर करण्यात आली. एकूण 10 फ्रँचायजींनी किती खेळाडूंना रिलीज केलं? सविस्तर जाणून घ्या.

जगातील सर्वात लोकप्रिय टी 20 स्पर्धा म्हणून आयपीएलची ओळख आहे. आयपीएल स्पर्धेतील एकूण 10 फ्रँचायजींनी शनिवारी 15 नोव्हेंबरला आगामी 19 व्या मोसमासाठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. एकूण 10 फ्रँचायजींनी 73 खेळाडूंना करारमुक्त केलं. तर 10 संघांनी एकूण 173 खेळाडूंना कायम राखलं. या 173 खेळाडूंमध्ये 49 विदेशी क्रिकेटपटू आहेत. आता 16 डिसेंबरला 77 खेळाडूंसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. या 77 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 10 संघांकडे एकूण 237 कोटी 55 लाख रुपये उपलब्ध आहेत. मिनी ऑक्शनचं आयोजन हे अबुधाबीतील एतिहाद एरीनामध्ये करण्यात आलं आहे. या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंना आणि क्रिकेट चाहत्यांना मिनी ऑक्शनची प्रतिक्षा असणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
IPL 2026 Mini Auction : 19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन कुठे
आयपीएल स्पर्धेतील 19व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन 16 ऑक्टोबरला अबुधाबीत होणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे एतिहाद एरीनामध्ये करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 77 खेळाडूंचा फैसला होणार आहे. प्रत्येक फ्रँचायजी आपल्या गरजेनुसार या स्पर्धेतून खेळाूंडवर बोली लावणार आहेत.
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शनंतर मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, मिचेल सँटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, आणि मयंक मार्कंडे.
ट्रेडद्वारे घेतलेले खेळाडू : शार्दुल ठाकुर आणि शरफेन रदरफोर्ड.
रिटेन्शननंतर टीम पलटण
Heading into the #TATAIPLAuction, already looking like a… 𝗪𝗢𝗪 😍💙 pic.twitter.com/WnV6jkW78w
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2025
-
-
IPL 2026 Retention LIVE Updates : लखनौ सुपर जायंट्सची रिटेन्शननंतरची टीम
ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव आणि आकाश सिंह.
ट्रेड केलेले एकूण 2 खेळाडू : मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर.
एलएसजी टीम
We’ve got our core for 2026 🩵
Next stop: The #TATAIPL Auction ⏳ pic.twitter.com/8i0gfdZxVD
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : पंजाब किंग्सचा रिटेन्शननंतरचा सुधारित संघ
श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, प्रियांश आर्या, शशांक सिंह, पियाला अविनाश, हरनूर पन्नू, हरप्रीत ब्रार, मुशीर खान, प्रभसिमरन सिंह, विष्णु विनोद, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसन, अजमातुल्लाह ओमरजई, युजवेंद्र चहल, विशाक विजयकुमार, यश ठाकुर, झेव्हीयर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन,सूर्यांश शेडगे, मिचेल ओवेन आणि अर्शदीप सिंह.
रिटेन्शननंतर पंजाब किंग्स टीम
2️⃣0️⃣2️⃣6️⃣ Dream begins here 🤞🦁#PunjabKings #IPL2026 pic.twitter.com/zmnVCQy4qB
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : गुजरात टायटन्सचा सुधरित संघ
गुजरातने आपल्यासोबत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोश बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, गुरनूर सिंह बरार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर आणि जयंत यादव.
रिटेन्शननंतर गुजरातचा संघ
Powered by thunder, charged up with lightning for yet another season! ⚡#AavaDe | #TATAIPL2026 | #TATAIPLRetention pic.twitter.com/FRcX24sAVu
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 15, 2025
-
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शननंतर हैदराबादच्या टीममध्ये कोण कोण?
पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर समरन, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स, जयदेव उनादकट, ईशान मलिंगा, झिशान अंसारी, कामिंदु मेंडीस आणि हर्षल पटेल.
सनराजयर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू
Retained & Ready to #PlayWithFire again 🔥#TATAIPL2026 pic.twitter.com/kuH062Us2z
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शननंतर गतविजेत्या आरसीबीची टीम कशी?
रजत पाटीदार (कॅप्टन) , विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टीम डेव्हिड, रोमेरियो शेफर्ड, जेकब बेथेल, नुवान तुषारा, रसीक सलाम, अभिनंदन सिंह, जोश हेझलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार आणि सुयश शर्मा.
आरसीबीचा सुधारित संघ
🔐 𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗: They gave us our first trophy, and they’re coming HOME to do it all over again. 🏆
Presenting, the first 1️⃣7️⃣ entrants of RCB’s #ClassOf2026, ready to #PlayBold and entertain the best fans in the world. ❤️#ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/NhgpWNRbjB
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : राजस्थान रॉयल्स टीममध्ये कोण कोण?
यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, वैभव सूर्यवंशी, डी प्रीटोरियस, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रियान पराग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, केवना मफाका आणि युद्धवीर सिंह.
ट्रेडद्वारे घेतलेले खेळाडू : रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड) आणि डोनोवन फरेरा (ट्रेड).
-
IPL 2026 Retention LIVE Updates : केकेआरमध्ये रिटेन्शननंतर कोण कोण? अशी आहे किंग खानची टीम
केकेआरचा सुधारित संघ : अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमॅन पॉवेल, सुनील नारायण, उमरान मलिक, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
रिटेन्शननंतर केकेआरची टीम
From Eden to the world: Your 𝐫𝐞𝐭𝐚𝐢𝐧𝐞𝐝 Knights for 2026 😍💜 pic.twitter.com/xL4ClNltUF
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शननंतर दिल्लीचा सुधारित संघ, कॅप्टन कोण?
अक्षर पटेल (कर्णधार), नितीश राणा (ट्रेड), केएल राहुल, करुण नायर, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विप्रराज निगम, अजय मंडल, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मुकेश कुमार.
दिल्लीचा सुधारित संघ
Your Tigers are ready to roar again in 2026 🐅❤️🔥 pic.twitter.com/bYpLYf0Ayz
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शननंतर कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज? जाणून घ्या आकडा
रिटेन्शननंतर आता मिनी ऑक्शनचं चित्र स्पष्ट झालं आहे. तसेच रिटेन्शननंतर कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज असणार आहे? हे देखील स्पष्ट आहे. केकेआरला सर्वाधिक 13 खेळाडूंची गरज असणार आहे.
कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज?
Slots remaining for IPL teams:
KKR – 13 MI – 5 RR – 9 LSG – 6 GT – 5 DC – 8 SRH – 10 RCB – 8 PBKS – 4 CSK – 9 pic.twitter.com/K6EIfDxcwT
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शननंतर मिनी ऑक्शनसाठी सर्वाधिक रक्कम कुणाकडे?
एकूण 10 फ्रँचायजींनी रिटेन्शन यादी जाहीर केलीय. त्यानंतर आता चाहत्यांना मिनी ऑक्शनचे वेध लागले आहेत. रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी आहे? कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम आहे? जाणून घ्या.
केकेआरकडे सर्वाधिक पर्स
🚨 THE PURSE FOR IPL 2026 MINI AUCTION 🚨
KKR – 64.3 Cr CSK – 43.4 Cr SRH – 25.5 Cr LSG – 22.9 Cr DC – 21.8 Cr RCB – 16.4 Cr RR – 16.05 Cr GT – 12.9 Cr PBKS – 11.5 Cr MI – 2.75 Cr pic.twitter.com/D5wEk64i0F
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : हैदराबादकडून 8 खेळाडू रिलीज
सनरायजर्स हैदराबादने एकूण 8 खेळाडूंना अलविदा केला आहे. एसआरएच फ्रँचायजीने अभिनव मनोहर, अर्थव तायडे, सचिन बेबी, मोहम्मद शमी, वियान मुल्डर, सिमरजीत सिंह, राहुल चाहर आणि ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पा याला बाहेर केलं आहे.
एसआरएकडून 8 खेळाडू करारमुक्त
🚨 SUNRISERS HYDERABAD RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/rOpfA5mN68
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : राजस्थान रॉयल्सने किती खेळाडू रिलीज केले?
राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेच्या दोघांसह एकूण 9 खेळाडू रिलीज केले आहेत. या 9 खेळाडूंमध्ये कुणाल सिंह राठौर, नितीश राणा, संजू सॅमसन (ट्रेड), वानिंदु हसरंगा, महेश तीक्षणा, फजलहक फारूकी, आकाश मढवाल, अशोक शर्मा आणि कुमार कार्तिकेय यांचा समावेश आहे.
राजस्थानकडून 8 खेळाडू रिलीज, 1 ट्रेड
🚨 RAJASTHAN ROYALS RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/KykAyjJHhU
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : दिल्ली कॅपिटल्सकडून 7 केळाडू करारमुक्त
दिल्ली कॅपिट्ल्सने 7 खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. या 7 खेळाडूंमध्ये फाफ डुप्लेलिस, जेक फ्रेजर मॅकगर्क, डोनोवन फरेरा, सेदिकुल्लाह अटल, मानवंथ कुमार, मोहित शर्मा आणि दर्शन नालकंडेचा समावेश आहे.
डीसीचा मोठा निर्णय
🚨 DELHI CAPITALS RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/SmgNJp4eQR
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : एलएसजीकडून घातक डेव्हिड मिलर रिलीज, शार्दूल ठाकुरचाही समावेश
एलएसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्सने एकूण 8 खेळाडू रिलीज केले. या 8 खेळाडूंमध्ये आर्यन जुयाल, डेव्हीड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शार्दूल ठाकुर (ट्रेड), आकाश दीप, रवी बिश्नोई आणि शामर जोसेफ यांचा समावेश आहे.
लखनौकडून 8 खेळाडूंना रामराम
🚨 LUCKNOW RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/Suz2wjD2dK
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : गुजरातने किती खेळाडू रिलीज केले?
गुजरात टायटन्सने एकूण 6 खेळाडूंना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या 6 खेळाडूंमध्ये शेरफेन रुदरफोर्ड, महिपाल लोमरोर, करीम जनात, दासुन शनाका, गेराल्ड कोएत्झी आणि कुलवंत खेजरोलिया यांचा समावेश आहे.
जीटीकडून 6 खेळाडूंना नारळ
🚨 GUJARAT TITANS RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/TE7Tcyy9Ca
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : गतविजेत्या आरसीबीकडून 8 खेळाडूंना नारळ
गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकूण 8 खेळाडूंना नारळ दिला आहे. आरसीबी फ्रँचायजीने स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टीम सायफर्ट, लियाम लिविंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एन्गिडी, ब्लेसिंग मुजरबानी आणि मोहित राठी या खेळाडूंना रिलीज केलं आहे.
आरसीबीकडून किती खेळाडू रिलीज?
🚨 RCB RETAINED & RELEASED PLAYERS 🚨 pic.twitter.com/Gd3GzIqeqL
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
IPL 2026 Retention LIVE Updates : पंजाब किंग्सकडून कोणते खेळाडू करारमुक्त?
पंजाब किंग्स गेल्या 18 मोसमापासून पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. पंजाबने 19 व्या मोसमासाठी जोश इंग्लिस, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे या 5 खेळाडूंना रिलीज केलं आहे.
पंजाबचा रिटेन्शननंतर सुधारित संघ
🚨 PBKS HAS RELEASED JOSH INGLIS 🚨 pic.twitter.com/U3uwZb7YmY
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
पलटणकडून 9 खेळाडू रिलीज,अर्जुन तेंडुलकरसह आणखी कुणाचा समावेश?
मुंबई इंडियन्स या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात पहिल्या यशस्वी संघाने एकूण 9 खेळाडूंना रिलीज केलं आहे. या 9 खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरसह सत्यनारायण राजू, रीस टॉपली, केएल श्रीजिथ, कर्ण शर्मा, बेवोन जेकब, मुजीब उर रहमान, लियाज विलियम्स आणि विगनेश पुथुर यांचा समावेश आहे.
मुंबईने रिलीज केलेल्या खेळाडूंची किंमत किती?
🚨 MUMBAI INDIANS WILL GO TO AUCTION WITH JUST 2.75 CRORE 🚨 pic.twitter.com/6ALidiWNuU
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
-
केकेआरने 12 वर्षांपासून सोबत असलेला आंद्रे रसेलला सोडलं, एकूण किती जणांना डच्चू?
केकेआरने विस्फोटक ऑलराउंडर आंद्रे रसेल याला 12 वर्षांनंतर अखेर रिलीज केलं आहे. तसेच केकेआरने उपकर्णधार वेंकटेश अय्यर यालाही करारमुक्त केलं आहे. केकेआरने वेंकटेश याला गेल्या हंगामात मेगा ऑक्शनमधून 23 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं. केकेआरने एकूण 5 खेळाडूंना रिलीज केलंय. यामध्ये आंद्रे आणि वेकंटेश व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक, मोईन अली आणि एनरिच नॉर्खिया यांचाही समावेश आहे.
केकेआरने रिलीज केलेल्या खेळाडूंची किंमत
आंद्रे रसेल (12 कोटी)
वेंकटेश अय्यर (23 कोटी 75 लाख)
एनरिच नॉर्खिया (6 कोटी 50 लाख)
क्विंटन डीकॉक (3 कोटी 60 लाख)
मोईन अली (2 कोटी)
-
IPL 2026 Retention LIVE Updates : आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर, चेन्नईकडून 10 खेळाडूंचा पत्ता कट
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 आधी 10 खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. सीएसकेने आधीच रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांना ट्रेड केलं. तर संजू सॅमसन याला आपल्या गोटात घेतलं. सीएसकेने या व्यतिरिक्त 8 खेळाडूंना करारमुक्त केलंय. त्यामुळे चेन्नईला ऑक्शनमधून 9 खेळाडूंची गरज असणार आहे. चेन्नईकडे ऑक्शनसाठी 43.4 कोटी रक्कम बाकी आहे.
चेन्नईचा सुधारित संघ
🚨 CSK RETAINED & RELEASED PLAYERS IPL 2026 🚨 pic.twitter.com/VnI6DG3nRJ
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2025
चेन्नईने करारमुक्त केलेले खेळाडू : राहुल त्रिपाठी, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, रचीन रवींद्र, सॅम करन, दीपक हुड्डा, शेख रशीद, कमलेश नागरकोटी, विजय शंकर आणि मथीशा पथिराना.
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रवींद्र जडेजाची घरवापसी, संजू सॅमसन सीएसकेसाठी खेळणार
रिटेन्शनआधी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आगामी हंगामासाठी सर्वात मोठी डील झाली. आयपीएल विजेत्या या 2 संघांनी संमतीने स्टार खेळाडूंची अदलाबदल केली. राजस्थानने चेन्नईकडून संजू सॅमसन याच्या बदल्यात रवींद्र जडेजाला आपल्यात घेतलं. जडेजाचं यासह राजस्थान टीममध्ये कमबॅक झालं. तर चेन्नईने संजूला आपल्या गोटात घेतलं आहे.
-
IPL 2026 Retention LIVE Updates : रिटेन्शनआधीच मुंबईच्या गोटात 2 ऑलराउंडर
मुंबई इंडियन्सने रिटनेन्शन आधीच ट्रेड विंडोद्वारे 2 खेळाडू आपल्या गोटात घेतले. पलटणने लोकल बॉय ऑलराउंडर शार्दूल ठाकुर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांना ट्रेडिंग विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं.
-
IPL 2026 Retention LIVE Updates : आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर, कोण रिलीज-कोण रिटेन?
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 फ्रँचायजींकडून त्यांनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना करारमुक्त केलंय? तर कुणावर विश्वासा दाखवला आहे हे आपण टीमनुसार जाणून घेऊयात.
-
IPL 2026 Retention LIVE Updates : थोड्याच वेळात खेळाडूंचा फैसला
आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी कोणते खेळाडू मिनी ऑक्शनमध्ये असणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. एकूण 10 फ्रँचायजी त्यांनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करणार आहेत. कोणत्या संघाने कोणत्या आणि किती खेळाडूंना करारमुक्त केलंय? हे आपण जाणून घेणार आहोत.
Published On - Nov 15,2025 4:58 PM
