MI vs RCB Live Score, IPL 2021 : हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक, मुंबईचा 54 धावांनी दारुण पराभव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 4:28 PM

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज आयपीएल 2021 मधील 39 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) हे दोन तगडे संघ भिडणार आहेत.

MI vs RCB Live Score, IPL 2021 : हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक, मुंबईचा 54 धावांनी दारुण पराभव

IPL 2021 चा 39 वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. भारतीय क्रिकेटचे दोन सर्वात मोठे स्टार, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी त्यांचे मागचे दोन्ही सामने गमावले आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्ले – ऑफच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. बंगळुरु सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. या विजयासह, मुंबईला टॉप 4 मध्ये परतण्याची संधी मिळेल, तर बंगळुरू विजय मिळूनही तिसऱ्याच स्थानावर राहील. मात्र हे त्यांचं प्ले ऑफच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत असताना अखेरच्या षटकात मात्र मुंबईत्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. पण कर्णधार रोहित शर्मा (43) सोडता एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने मुंबईला 54 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 26 Sep 2021 11:33 PM (IST)

  MI vs RCB: आरसीबी विजयी

  हर्षलने महत्त्वाचे विकेट घेतल्यानंतर अखेरचे फलंदाज लवकर बाद झाल्याने मुंबईचा संघ 54 धावांनी पराभूत झाला आहे.

 • 26 Sep 2021 11:14 PM (IST)

  MI vs RCB: बुमराहही बाद

  हर्षलने हॅट्रिक घेताच पुढच्याच षटकात चहलने बुमराहला बाद करत मुंबईला जवळपास पराभूत केलं आहे. आता मुंबईच्या हातात केवळ एक विकेट आहे.

 • 26 Sep 2021 11:13 PM (IST)

  MI vs RCB: हर्षल पटेलची हॅट्रिक!

  आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने अप्रतिम हॅट्रिक घेतली आहे. आधी पंड्या आणि पोलार्डला बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने राहुल चाहरलाही पायचीत केलं.

 • 26 Sep 2021 11:07 PM (IST)

  MI vs RCB: मुंबईला दोन मोठे झटके

  आरसीबीचा पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला दोन मोठे झटके दिले आहेत. हार्दीक पंड्या आणि कायरन पोलार्डला बाद करत त्याने सामना आरसीबीच्या दिशेने झुकवला आहे.

 • 26 Sep 2021 10:56 PM (IST)

  MI vs RCB: मुंबईचा निम्मा संघ तंबूत परत

  एकामागोमाग एक विकेट जात असल्याने मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. सिराजच्या चेंडूवर चहलने त्याचा झेल घेतला आहे.

 • 26 Sep 2021 10:45 PM (IST)

  MI vs RCB: कृणाल पंड्या बाद

  मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या बाद झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद करत मुंबईला चौैथा झटका दिला आहे.

 • 26 Sep 2021 10:29 PM (IST)

  MI vs RCB: इशान किशनही बाद

  मुंबईचा आणखी एक गडी तंबूत परतला आहे. युझवेंद्र चहलच्या चेंडूलर हर्षल पटेलने इशान किशनचा झेल घेतला आहे.

 • 26 Sep 2021 10:25 PM (IST)

  MI vs RCB: कर्णधार रोहित शर्माही बाद

  सलामीवीर डिकॉक बाद होताच काही वेळात रोहित शर्माही झेलबाद झाला आहे. मॅक्सवेल्च्या चेंडूवर देवदत्त पडीक्कलने त्याचा झेल पकडला आहे.

 • 26 Sep 2021 10:09 PM (IST)

  MI vs RCB: सलामीवीर डिकॉक आऊट!

  सलामीवीर डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला उत्तम सुरुवात करुन दिली होती. मात्र पावरप्ले संपताच अनुभवी चहलने डिकॉकला बाद करत मुंबईला पहिला झटका दिला आहे.

 • 26 Sep 2021 09:43 PM (IST)

  MI vs RCB: रोहित-डिकॉक जोडी मैदानात

  166 धावा करण्यासाठी मुंबईने फलंदाजीला सुरुवात केली आहे. सलामीवीर डिकॉक आणि रोहित शर्मा मैदानात उतरले आहेत.

 • 26 Sep 2021 09:20 PM (IST)

  MI vs RCB: मुंबईसमोर 166 धावांचे लक्ष्य

  आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत असताना अखेरच्या काही षटकांत आधी बुमराहने आणि नंतर ट्रेन्ट बोल्टने भेदक गोलंदाजी करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं आहे. त्यामुळे मुंबईसमोर 166 धावांचे आव्हान आहे.

 • 26 Sep 2021 09:08 PM (IST)

  MI vs RCB: बुम!बुम!बुमराह, सलग दोन विकेट

  भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात लागोपाठ दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलीयर्सची विकेट घेतली आहे.

 • 26 Sep 2021 09:03 PM (IST)

  MI vs RCB: मॅक्सवेलचं अर्धशतक पूर्ण

  कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलीयर्स यांनी आरसीबीचा डाव साभांळला असून नुकतच मॅक्सवेलनं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

 • 26 Sep 2021 08:50 PM (IST)

  MI vs RCB: विराट कोहलीचं आऊट

  अर्धशतक झाल्यानंतर काही वेळातच विराट कोहली बाद झाला आहे. अॅडम मिल्ने याने त्याचा विकेट घेतला आहे.

 • 26 Sep 2021 08:41 PM (IST)

  MI vs RCB: कोहलीचं अर्धशतक पूर्ण

  कोहलीने आणखी एक अर्धशतक ठोकलं आहे. त्याने 40 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

 • 26 Sep 2021 08:29 PM (IST)

  MI vs RCB: आरसीबीच्या 100 धावा पूर्ण

  13 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने चौकार खेचत आरसीबी संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.

 • 26 Sep 2021 08:21 PM (IST)

  MI vs RCB: श्रीकर भरत बाद

  कर्णधार विराटसोबत एक चांगली भागिदारी रचत असलेल्या भरतला मुंबईचा फिरकीपटू राहुलने बाद केलं आहे. 37 धावांवर भरतचा झेल सूर्यकुमार यादवने घेतला आहे.

 • 26 Sep 2021 08:13 PM (IST)

  MI vs RCB: विराटची बॅट तळपतेय

  पडीक्कल बाद झाल्यानंतर कर्णधार विराटने युवा फलंदाज श्रीकर भरतसोबत दमदार फलंदाजी करत पावरप्लेमध्ये संघाला चांगल्या धावा करुन दिल्या आहेत. 8 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर 63 धावा आहे.

 • 26 Sep 2021 07:43 PM (IST)

  MI vs RCB: देवदत्त खाते न खोलताच तंबूत परत

  आरसीबीचा धाकड सलामीवीर देवदत्त पडीक्कल आज खाते न खोलताच बाद झाला आहे. बुमराहच्या चेंडूवर यष्टीरक्षक डिकॉकने त्याचा झेल घेतला आहे.

 • 26 Sep 2021 07:26 PM (IST)

  रवींद्र जाडेजाही बाद

  रवींद्र जाडेजाही बाद झाला असून आता चेन्नईला एका चेंडूत एक धाव हवी आहे.

 • 26 Sep 2021 07:16 PM (IST)

  जाडेजाचे लागोपाठ दोन षटकार

  सामना रंगतदार स्थितीत असताना चेन्नईच्या जाडेजाने लागोपाठ दोन षटकार आणि दोन चौकार ठोकत सामना चेन्नईच्या दिशेने झुकवला आहे.

 • 26 Sep 2021 07:11 PM (IST)

  नाणेफक जिंकून मुंबईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 26,2021 7:08 PM

Follow us

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI