PHOTO: मुंबईत तयार होत आहे धोनीचं नवं घर, समुद्राच्या शेजारी असणाऱ्या घराचे फोटो साक्षीने केले शेअर

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अधिककाळ आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून येतो. त्याची पत्नी साक्षी त्यांचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते. आताही साक्षीने त्यांच्या नव्या घराच्या बांधकामाचे काही फोटो शेअर केले आहेत.

1/5
भारताला मानाच्या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीचा चाहतावर्ग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे धोनीचे फोटो त्याच्या बद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुक असतात. धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलचे अनेक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिनं त्यांच मुंबईत तयार होत असलेल्या घराचे फोटो शेअर केले.

2/5
साक्षी धोनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले. ज्यासा न्यू होम म्हणजेच नवं घर असं कॅप्शन दिलं होतं. त्यातूनच धोनीच्या मुंबई येथे तयार होत असलेल्या नव्या घराबद्दल चाहत्यांना कळालं.

3/5
धोनी सध्या उर्वरीत आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला गेला आहे. तो सध्या त्याठिकाणी सराव करत असून सीएसकेच्या सोशल मीडियावर धोनीचे नवनवीन फोटो त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतात.

4/5
धोनीची पत्नी साक्षी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत तिच्या इन्स्टाग्रामवरुन धोनीच्या फार्महाऊसचे आणि तेथील प्राण्यांसह इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तसेच ते सगळे फिरायला गेल्यावरही साक्षी तेथील फोटो पोस्ट करत असते.

5/5
धोनीने पुण्यातही नुकतंच घर घेतलं. त्याच्या या सगळ्या घरांमध्ये त्याच रांची येथील फार्म हाऊस सर्वात प्रसिद्ध आहे. त्याच्या या फार्महाऊसचं नाव 'कैलाशपती' असं आहे. या सर्व फार्महाऊसची काळजी घेण्यासाठी बरेच नोकर चाकर असतानाही धोनीह स्वत:ही त्यात लक्ष देताना दिसून येतो. या फार्महाऊसमध्ये कुत्री, गायी, घोडे असे अनेक पाळीव प्राणी आहेत. सोबतच फळ आणि भाज्यांची झाडंही आहेत. धोनी या झाडांसह तेथील प्राण्यांची काळजी स्वत: घेत असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI