PBKS vs MI Score And Updates IPL 2025 : पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक, मुंबई इंडियन्सला 5 विकेट्सने नमवलं
Punjab Kings vs Mumbai Indians Score IPL 2025 Qualifier 2 Match Updates And Highlights : आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेl. 18 व्या पर्वात आयपीएलचा नवा विजेता मिळणार हे निश्चित झालं आहे. कारण या दोन्ही संघांनी एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही.

आयपीएल 2025 मधील क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट राखून धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान पंजाब किंग्सने 19 षटकात पूर्ण केलं. पंजाब किंग्सचा अंतिम फेरीत सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. 3 जूनला हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. 18व्या पर्वात नवा विजेता संघ क्रीडारसिकांना पाहायला मिळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक, मुंबई इंडियन्सला 5 विकेट्सने नमवलं
पंजाब किंग्सने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत नवा विजेता मिळणार हे स्पष्ट आहे. कारण या दोन्ही संघांनी जेतेपद मिळवलेलं नाही. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 5 विकेट गमवून पूर्ण केलं. या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त खेळी केली.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : शशांक सिंह धावचीत, 2 धावा करून तंबूत
पंजाब किंग्सला विजयाच्या दिशेने कूच करत असताना शशांक सिंह धावचीत झाला. त्याचा खेळ 2 धावांवर आटोपला. त्याच्या विकेटमुळे मुंबई इंडियन्सला काही अंशी बळ मिळालं आहे.
-
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : श्रेयस अय्यरची कॅप्टन इनिंग, अर्धशतकी खेळीसह विजयाच्या जवळ
श्रेयस अय्यरने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आक्रमक खेळीसह संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शेवटपर्यंत उभा राहिल्यास पंजाब किंग्सला विजय मिळवून देऊ शकतो.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : नेहल वढेराच्या रुपाने चौथा धक्का, 48 धावा करून तंबूत
नेहल वढेराच्या रुपाने पंजाब किंग्सला चौथा धक्का बसला आहे. अश्वनी कुमारच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला. त्याने 29 चेंडूत 48 धावांची खेळी केली.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : श्रेयस अय्यरची आक्रमक खेळी, मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली
श्रेयस अय्यरने रिस टोपलीच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. तीन षटकार मारल्याने मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली आहे. एका षटकात 19 धावा आल्या.
-
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला 48 चेंडूत 95 धावांची गरज, मुंबईची विकेटसाठी धडपड
पंजाब किंग्सला 48 चेंडूत 95 धावांची गरज आहे. पंजाब किंग्सच्या हातात अजून 7 विकेट असल्याने संधी आहे. तर मुंबई इंडियन्स एका विकेटच्या शोधात आहे.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला तिसरा झटका, जोश इंग्लिसचा आक्रमक खेळ संपला
जोस इंग्लिसची विकेट काढण्यात अखेर कर्णधार हार्दिक पांड्याला यश आलं आहे. 21 चेंडूत 38 धावांची खेळी केली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली होती. पण त्याची विकेट गेली आणि मुंबईच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये पंजाब किंग्सच्या 2 बाद 64 धावा
पॉवर प्लेमध्ये पंजाब किंग्सने 2 गडी गमवून 64 धावा केल्या आहेत. यात जसप्रीत बुमराहचं एक षटक खूपच महाग पडलं. त्याने या षटकात 20 धावा दिल्या. जोश इंग्लिस चांगली फटकेबाजी करत आहे.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला दुसरा झटका, प्रभसिमरननंतर प्रियांश तंबूत
पंजाब किंग्सला प्रियांश शर्माच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. अश्वनी कुमारच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग फटका मारताना फसला आणि झेलबाद झाला. त्याने 10 चेंडूत 20 धावांची खेळी केली.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : जोस इंग्लिसने जसप्रीत बुमराहला झोडला, एका षटकात 20 धावा
जोस इंग्लिसने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्याच्या एका षटकात 20 धावा आल्या. त्याने दोन षटकार आणि दोन चौकार मारले.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला पहिला झटका, प्रभसिमरन 6 धावा करून तंबूत
पंजाब किंग्सला प्रभसिमन सिंहच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. सहा धावांवर असताना ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यामुळे पंजाब किंग्सवर दडपण वाढलं आहे.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : पंजाबकडून प्रियांश आणि प्रभसिमरन जोडी मैदानात
मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून प्रियांश आणि प्रभसिमरन ही जोडी मैदानात आली आहे. दरम्यान प्लेऑफमध्ये मुंबईने जेव्हा 200 च्या वर धावा केल्या तेव्हा त्या गाठणं कठीण झालं आहे. 18 सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं आहे.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचं पंजाबसमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान
मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 203 धावा केल्या असून पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान पंजाब गाठते की मुंबई डिफेंड करते हे महत्त्वाचं आहे. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी लढणार आहे. मुंबईकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने प्रत्येकी 44 धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने 38 आणि नमन धीरने 37 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंग सोडून सर्वांना विकेट मिळाल्या. अझमुतुल्लाह ओमरझाईने दोन विकेट घेतल्या.
-
PBKS vs MI Live Score, IPL 2025 : मुंबईला सहावा झटका, नमन धीर आऊट
मुंबई इंडियन्सला नमन धीरच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. 18 चेंडूत 37 धावांची खेळी करून बाद झाला आहे. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असून 200 धावांच्या आसपास आहेत.
-
PBKS vs MI Live Score : मुंबईला पाचवा झटका, कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट
पंजाब किंग्सने निर्णायक क्षणी मुंबईला पाचवा झटका दिला आहे. पंजाबने मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याला आऊट केलं आहे. अझमतुल्लाह ओमरझई याने हार्दिकला जोस इंग्लिस याच्या हाती कॅच आऊट केलं. हार्दिकने 1 फोरसह 13 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 18 ओव्हरनंतर 5 आऊट 180 असा झाला आहे.
-
PBKS vs MI Live Score : मुंबईची सेट जोडी माघारी, सूर्यानंतर तिलक वर्मा आऊट
पंजाब किंग्साने निर्णायक क्षणी सामन्यात कमबॅक केलं आहे. पंजाबने सूर्यकुमार यादव याच्यानंतर तिलक वर्मा याला आऊट करत सेट जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तिलकच्या रुपात मुंबईने चौथी विकेट गमावली. तिलकने सूर्याप्रमाणे 44 धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा 14.1 ओव्हरनंतर 4 आऊट 142 असा स्कोअर झाला आहे.
-
PBKS vs MI Live Score : सूर्यकुमारच्या तोडू खेळीचा शेवट, मुंबईला तिसरा झटका
मुंबई इंडियन्सचा तिसरा झटका लागला आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. युझवेंद्र चहल याने सूर्यकुमार यादवला आऊट केलं. चहलने सूर्याला आऊट करत त्याला अर्धशतक करण्यापासून रोखलं. सूर्याने 3 सिक्स आणि 4 फोरसह 26 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. सूर्याची ही या मोसमात 25 पेक्षा अधिक धावा करण्याची सलग 16 वी वेळ ठरली.
-
PBKS vs MI Live Score : सूर्यकुमार-तिलक वर्मा जोडी जमली, मुंबई 100 पार
रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो सलामी जोडी आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा जोडी सेट झाली आहे. या जोडीने केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर मुंबईने 10 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 102 रन्स केल्या आहेत. सूर्यकुमार यादव 16 आणि तिलक वर्मा 32 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
PBKS vs MI Live Score : मुंबईला दुसरा झटका, जॉनी बेयरस्टो आऊट, सलामी जोडी माघारी
मुंबई इंडियन्सने दुसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. मुंबईचा ओपनर जॉनी बेयरस्टो आऊट झाला आहे. विजयकुमार वैशाख याने जॉनी बेयरस्टो याला जोश इंग्लिस याच्या हाती कॅच आऊट केलं. जॉनीने 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 38 रन्स केल्या. जॉनी आऊट झाल्याने मुंबईची 7 ओव्हरनंतर 2 आऊट 70 अशी स्थिती झाली.
-
PBKS vs MI Live Score : मुंबईच्या पावरप्लेनंतर 1 आऊट 67 रन्स, जॉनी बेयरस्टो-तिलक वर्मा जोडी मैदानात
मुंबई इंडियन्सने पावरप्लेमधील 6 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 65 रन्स केल्या आहेत. जॉनी बेयरस्टो 36 रन्सवर नॉट आऊट आहे. तर तिलक वर्मा 14 धावांवर नाबाद खेळत आहे. मुंबईने रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितने 8 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
PBKS vs MI Live Score : मुंबईला पहिला आणि मोठा झटका, रोहित शर्मा आऊट
मुंबई इंडियन्सला पहिला आणि मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा आऊट झाला आहे. मार्कस स्टोयनिस याने रोहितला तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विजयकुमार वैशाख याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने 7 बॉलमध्ये 1 फोरसह 8 रन्स केल्या.
-
PBKS vs MI Live Updates : मुंबईची बॅटिंग, रोहित-बॅरीस्टो सलामी जोडी मैदनात
अखेर सव्वा 2 तासांच्या प्रतिक्षेनंतर पंजाब विरुद्ध मुंबई क्वालिफायर 2 सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यनाला 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झालीय. पंजाबने मुंबईला टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात आहे. तर पंजाबकडून अर्शदीप सिंह पहिली ओव्हर टाकत आहे.
-
PBKS vs MI Live Updates : पावणे दहा वाजता सामन्याला सुरुवात होणार
क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब-मुंबई सामन्याला रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार असल्याची माहिती, आयपीएलकडून देण्यात आली आहे. पावसामुळे टॉसनंतर खेळ सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे 2 तासांचा खेळ वाया गेला. मात्र दरम्यानच्या वेळेत पाऊस थांबला आणि ग्राउंड स्टाफने खेळपट्टी कोरडी केली. त्यामुळे आता अखेर सव्वा 2 तासांच्या प्रतिक्षेनंतर पहिला बॉल टाकला जाणार आहे.
-
PBKS vs MI Live Updates : पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, चाहत्यांना दिलासा
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. पंजाब विरुद्ध मुंबई क्वालिफायर-2 सामन्यात अखेर पाऊस थांबला आहे. पावसामुळे जवळपास 2 तासांचा वेळ वाया गेला. मात्र त्यानंतर पाऊस थांबला. त्यानंतर ग्राउंड स्टाफने मोठ्या मेहनतीतने खेळपट्टी कोरडी केली. आता सामन्याला किती वाजता सुरुवात होते? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
-
PBKS vs MI Live Updates : कधी थांबणार हा पाऊस? अहमदाबादमध्ये मुसळधार
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील जवळपास 2 तासांचा खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. पावसामुळे टॉसनंतर सामना सुरुच होऊ शकला नाही. तसेच पुढील आणखी काही मिनिटं सामना सुरु होणार नाही, हे स्पष्ट आहे. पावसाने 11.56 पर्यंत विश्रांती घेतली तर 5-5 षटकांचा सामना होऊ शकतो.
-
PBKS vs MI Live Updates : अहमदाबादमध्ये पावसाची बॅटिंग सुरुच, चाहत्यांची निराशा
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेल्या काही मिनिटांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसामुळे एक तासापेक्षा अधिक वेळ वाया गेला आहे. प्लेऑफमधील सामन्यांसाठी 2 तास अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे 9. 30 पर्यंत पाऊस थांबल्यास संपूर्ण 20 ओव्हरचा खेळ होईल. मात्र त्यानंतर पाऊस सुरुच राहिला तर षटकं कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे सामना लवकरात लवकर सुरु व्हावा, अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांची आहे.
-
PBKS vs MI Live Updates : पावसाचा पुन्हा खोडा
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 सामना सुरु होण्याआधी पावसाने दुसऱ्यांदा खोडा घातला आहे. त्यामुळे सामन्याला सुुरुवात होण्यास आणखी वेळ लागणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार होती. मात्र काही वेळ पावसाने वाया घालवला. त्यानंतर काही वेळ पाऊस थांबल्याने सामन्याला 8.25 ला सुरुवात होणार, अशी माहिती देण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आता सामना केव्हा सुरु होणार? हे पाऊस थांबण्यावर अवलंबून असणार आहे.
-
PBKS vs MI Live Score Updates : पावसाच्या एन्ट्रीमुळे सामन्याला सुरुवात होणयास विलंब
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना सुरु होण्याआधीच पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांचे खेळाडू पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करत आहेत. पंजाबने किंग्सने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. सामन्याला निर्धारित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाने खोडा घातल्याने अद्याप खेळाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सामना लवकरात लवकर सुरु व्हावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांची आहे.
क्वालिफायर 2 मध्ये पावसाची एन्ट्री
🚨 RAIN IS BACK 🚨
– Bad news for Cricket fans….!!!!! pic.twitter.com/Sq4BnWis2y
— Johns. (@CricCrazyJohns) June 1, 2025
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सचे इम्पॅक्ट प्लेयर
पंजाब किंग्ज इम्पॅक्ट प्लेयर: प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, हरप्रीत ब्रार
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचे इम्पॅक्ट प्लेयर
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर: अश्वनी कुमार, कृष्णन श्रीजीथ, रघु शर्मा, रॉबिन मिन्झ, बेव्हॉन जेकब्स
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सची प्लेइंग 11
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला…
हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. आम्हाला चांगली फलंदाजी करायची आणि परिस्थितीचे मूल्यांकन करायचे होते. आता परिस्थिती चांगली झाली आहे. जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुम्हाला काही मदत मिळेल. बऱ्याच क्षेत्रांमध्ये आम्हाला सुधारणा करता आली असती. एक दिवसाचा ब्रेक, तो कठीण आहे पण आम्हाला काय करायचे हे माहित आहे. आम्ही खेळानंतर खूप सकाळी आलो, बहुतेक खेळाडूंनी रिकव्हरीवर लक्ष केंद्रित केले. आम्हाला एक बदल करावा लागला. टॉपली संघात आला आहे, ग्लीसनला बसवलं आहे.
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस म्हणाला की…
श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. थोडेसे ढगाळ वातावरण होते आणि खेळपट्टीही कव्हरखाली होती. हा एक ताजा खेळ आहे, आपली मानसिकता बाहेर जाऊन जिंकण्याची आहे. वातावरण उत्कृष्ट आहे. युझी संघात येत आहे.
-
PBKS vs MI Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, श्रेयसने निवडली गोलंदाजी
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. तसेच प्लेइंग 11 मध्ये युजवेंद्र चहल याची एन्ट्री झाली आहे.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : कोण जिंकणार टॉस?
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 7 सामने खेळवण्यात आले आहेत. या 7 पैकी 6 सामन्यात पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. पंजाब विरुद्ध मुंबई क्वालिफायर 2 सामन्यातील टॉस संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. त्यामुळे आता टॉस कोण जिंकतो? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : दोन्ही संघ IPL 2025 मध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची आयपीएल 2025 मध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघांचा साखळी फेरीत 26 मे रोजी आमनासामना झाला होता. तेव्हा पंजाबने मुंबईवर मात केली होती.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : मुंबई आणि पंजाब दोन्ही संघ तुल्यबळ
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 33 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. मुंबईने 33 पैकी 17 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 16 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आकडे पाहता तोडीसतोड आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : दोन्ही संघ पहिल्यांदा प्लेऑफमध्ये आमनेसामने
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या पहिल्या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : पंजाब किंग्स टीम
प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, मुशीर नौशाद खान, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, झेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, मिशेल ओवेन, हरनूर सिंग आणि पायला अविनाश.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, अश्वनी कुमार, रॉबिन मिंज, रघु शर्मा, कृष्णन श्रीजीथ, रीस टोपली, कर्ण शर्मा, दीपक चहर, चरित असलंका, मुजीब उर रहमान, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स आणि सत्यनारायण राजू.
-
PBKS vs MI Qualifier 2 Live Updates : मुंबईसमोर पंजाबचं आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?
आयपीएल 2025च्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अंतिम फेरीत खेळेल.
Published On - Jun 01,2025 5:44 PM
