AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI Score and Highlights Updates, IPL 2026: आरसीबीने मुंबई इंडियन्सला 2 गडी राखून नमवलं, गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप

| Updated on: May 11, 2026 | 7:35 AM
Share

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Score and Highlights Updates in Marathi : रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून गेल्या पराभवाचा हिशोब करण्याची संधी होती. मात्र आरसीबीने मुंबईवर शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला आणि 2 गुण मिळवले.

RCB vs MI Score and Highlights Updates, IPL 2026: आरसीबीने मुंबई इंडियन्सला 2 गडी राखून नमवलं, गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप
RCB vs MI Ipl 2026 Live Score UpdatesImage Credit source: TV9

आयपीएल 2026 स्पर्धेतील 54 व्या सामन्यात आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. आरसीबीने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईने आरसीबीसमोर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर नमन धीर याने 47 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात आरसीबीसाठी कृणाल पंड्या याने 73 धावांची खेळी केली. आरसीबीला विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज होती. रसीख सलाम डार याने 2 धावा करुन आरसीबीला जिंकवलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 10 May 2026 11:42 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : आरसीबीने मुंबई इंडियन्सला 2 गडी राखून नमवलं, गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप

    आरसीबीने मुंबई इंडियन्सला 2 गडी राखून पराभवाची धूळ चारली आहे. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती आणि धावा काढल्या आणि विजय साजरा केला.

  • 10 May 2026 11:37 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : आरसीबीला आठवा धक्का

    रोमारियो शेफर्डच्या रुपाने आरसीबीला आठवा धक्का बसला आहे. रोमारियो शेफर्ड 11 चेंडूत 4 धावांची खेळी करून बाद झाला. तीन चेंडूत 10 धावांची गरज आहे.

  • 10 May 2026 11:23 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : आरसीबीला सातवा धक्का, कृणाल पांड्या बाद

    कृणाल पांड्याच्या रुपाने आरसीबीला सातवा धक्का बसला आहे. 45 चेंडूत 73 धावांची खेळी करून बाद झाला.  12 चेंडूत 18 धावांची आवश्यकता आहे.

  • 10 May 2026 11:08 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : आरसीबीला सलग दुसरा धक्का, टिम डेविडच्या रुपाने सहावा खेळाडू बाद

    जितेश शर्मा बाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर टिम डेविडच्या रूपाने धक्का बसला आहे. त्यामुळे आरसीबीवर प्रेशर वाढलं आहे. आरसीबीचे सहा विकेट तंबूत गेले आहेत.

  • 10 May 2026 11:05 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : जितेश शर्मा बाद

    आरसीबीला जितेश शर्माच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. जितेश शर्मा 18 धावांवर बाद झाला. कॉर्बिन बॉशच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना चेंडू वर चढला आणि नमन धीरने त्याचा झेल पकडला.

  • 10 May 2026 11:00 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : कृणाल पांड्याचं 32 चेंडूत अर्धशतक, मुंबई अडचणीत

    कृणाल पांड्याने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची अडचण वाढली आहे. त्याची विकेट मिळत नसल्याने विजय दूर जात असल्याचं दिसत आहे.

  • 10 May 2026 10:41 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चौथा धक्का, बेथेल 27 धावांवर बाद

    जेकॉब बेथेलच्या रुपाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चौथा धक्का बसला आहे. 27 धावा करून तंबूत परतला आहे. कॉर्बिन बॉशच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारता चुकला आणि तिलक वर्माने त्याचा झेल घेतला.

  • 10 May 2026 10:19 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : कॅप्टन रजत पाटीदार आऊट, आरसीबीला तिसरा झटका

    मुंबई इंडियन्सने तुलनेत लो स्कोअरिंग सामन्यात आरसीबीला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे. मुंबईने विराट कोहली, देवदत्त पडीक्कल याच्यानंतर कॅप्टन रजत पाटीदार याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. कॉर्बिन बॉश याने  रजत पाटीदार याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रजतने 8 धावा केल्या.

  • 10 May 2026 09:54 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : विराटनंतर देवदत्त पडीक्कल आऊट, आरसीबीला दुसरा झटका

    दीपक चहर याने विराट कोहली याला झिरोवर आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला. दीपकने देवदत्तला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. देवदत्तने 12 धावा केल्या.

  • 10 May 2026 09:42 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : विराट कोहली गोल्डन डक, आरसीबीला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका

    वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने मुंबई इंडियन्सला आरसीबी विरुद्ध जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. दीपकने 167 धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला पहिल्याच ओव्हरध्ये मोठा झटका दिला आहे. आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. विराटची या मोसमात झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली आहे.

  • 10 May 2026 09:22 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : मुंबईच्या 166 धावा, पलटण आरसीबीला रोखणार?

    मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिलक वर्मा याचं अर्धशतक आणि नमन धीर याने केलेल्या 40 पेक्षा अधिक धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंत मजल मारता आली. आता 2 गुणांची कमाई कोणता संघ करतो हे पाहणँ महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 10 May 2026 09:10 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : तिलक वर्मा आऊट, मुंबई द्विशतक करणार?

    मुंबई इंडियन्सचाा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा याने अर्धशतक झळकावलं आहे. तिलकने अर्धशतकानंतर 7 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार याने तिलक वर्मा याला आऊट करत मुंबईला सहावा झटका दिला आहे. त्याुळे मुंबईचा स्कोअर 18 ओव्हरमध्ये 6 आऊट 155 झाला आहे. त्यामुळे आता मुंबई 12 बॉलमध्ये 45 रन्स करुन मुंबईला 200 पर्यंत पोहचवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 10 May 2026 08:54 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : विल जॅक्स माघारी, मुंबईचा अर्धा संघ तंबूत

    रोमरिया शेफर्ड याने मुंबईला झटका दिला आहे. रोमरियोने विल जॅक्स याला जेकब बेथल याच्या हाती कॅच आऊट केलं. विलने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 10 May 2026 08:45 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : मुंबईला चौथा झटका, नमन धीर आऊट

    आरसीबीने मुंबईला चौथा झटका दिला आहे. रसीख सलाम डार याने मुंबईची नमन धीर आणि तिलक वर्मा ही सेट जोडी फोडली आहे. रसीखने नमनला बोल्ड केलं. नमनने 32 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. नमनने 5 फोर आणि 2 सिक्स लगावले.

  • 10 May 2026 08:39 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : नमन-तिलकची जबरदस्त भागीदारी, मुंबईचं शतक

    आरसीबीने मुंबईला झटपट 3 झटके दिले.त्यामुळे मुंबईची 3 आऊट 28 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्मा या जोडीने कमाल केली आहे. या दोघांनी काही वेळ संयमी बॅटिंग केल्यानंतर फटकेबाजी केली आणि मुंबईला 100 पार पोहचवलंय.

  • 10 May 2026 08:13 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : नमन-तिलकने मुंबईला सावरलं, पलटणला मोठ्या भागीदारीची गरज

    भुवनेश्वर कुमार याने मुंबईला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. भुवीने रायन रिकेल्टन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या तिघांना आऊट केलं. त्यामुळे मुंबईची 3 ओव्हरमध्ये 3 आऊट 28 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्मा या दोघांनी मुंबईचा डाव सावरला आहे. या दोघांनी मुंबईला 8 ओव्हरपर्यंत 65 धावांपर्यंत पोहचवलं आहे. नमन 17 आणि तिलक 19 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 10 May 2026 07:54 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : रोहितनंतर सूर्या आऊट, मुंबईची घसरगुंडी, आरसीबीकडून तिसरा झटका

    भुवनेश्वर कुमार याने आरसीबीला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. भुवनेश्वरने रायन रिकेल्टन याला आऊट करत मुंबईला पहिला झटका दिला. त्यानंतर भुवीने मुंबईला डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये डबल झटका दिला. भुवीने सेट रोहित शर्मा याच्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला आऊट केलं. रोहितने 22 धावा केल्या. तर सूर्याला भोपळाही फोडता आला नाही.

  • 10 May 2026 07:41 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    आरसीबीने मुंबई इंडियन्सला पहिला झटका दिला आहे. आरसीबीचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमार याने रायन रिकेल्टन याला कॅप्टन रजत पाटीदार याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 10 May 2026 07:33 PM (IST)

    RCB vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, रोहित-रायन मैदानात

    रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आहे.

  • 10 May 2026 07:12 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.

  • 10 May 2026 07:11 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन  : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर.

  • 10 May 2026 07:08 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : आरसीबीने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध बॉलिंगचा निर्णय

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीने सलग 2 पराभवानंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 10 May 2026 06:48 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : दोन्ही संघांची 19 व्या मोसमातील कामगिरी

    आरसीबी आणि मुंबई दोन्ही संघांनी 19 व्या मोसमात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आरसीबीने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. बंगळुरु चौथ्या आणि मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.

  • 10 May 2026 06:44 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम

    रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (कॅप्टन), जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हीड, कृणाल पंड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रसिक सलाम दार, जोश हेझलवूड, जॉर्डन कॉक्स, मंगेश यादव, विकी ओस्तवाल, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, स्वप्नील सिंग, फिलिप सॉल्ट, नुवान तुषारा, विहान मल्होत्रा, अभिनंदन सिंग, कनिष्क चौहान आणि सात्विक देसवाल.

  • 10 May 2026 06:29 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, रघु शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, क्विंटन डी कॉक, केशव महाराज, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दानिश मलेवार, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, हार्दिक पंड्या आमि क्रिश भगत.

  • 10 May 2026 06:21 PM (IST)

    RCB vs MI Live Updates : मुंबईसमोर आरसीबीचं आव्हान, पलटण रोखणार?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्यातील पहिला बॉल हा संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टाकण्यात येणार आहे. तर तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Published On - May 10,2026 6:21 PM

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत