सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. जगभरात आपल्या खेळामुळे प्रसिद्ध असलेल्या सचिनची मुलगी सारा सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनत आहे. तिचे सुंदर फोटो नेटकऱ्यांचं मन जिंकत आहेत.
Sep 19, 2021 | 10:50 PM
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. मुलगा अर्जुनला नुकतंच मुंबई इंडियन्सने विकत घेतलं असून तो वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू आहे. तर मुलगी सारा तेंडुलकर ही देखील सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती कायम आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन लाईक्स लुटत असते.
1 / 5
साराने नुकतेच काही जीममधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती जीमच्या कपड्यात दिसत असून तिचा फिटनेस एखाद्या एथलिट अर्थात खेळाडूप्रमाणे दिसून येत आहे.
2 / 5
साराने या फोटोना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने घातलेल्या पॅन्टची (लेगीन्ग्स) जाहिरात केली आहे. ही पॅन्ट तिच्या मैत्रीणीचा ब्रँड असणाऱ्या कंपनीची असून जीमसाठी हे कपडे अत्यंत उपयुक्त असल्याचं साराने सांगितलं आहे. तिने कॅप्शनमध्ये मैत्रीनीला टॅग देखील केलं आहे.
3 / 5
सारा कायमच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती शिक्षणासाठी लंडनमध्ये असल्याने अनेकदा तिचे फोटो हे मुंबई आणि लंडन या ठिकाणचेच असतात. तिने तिच्या इन्स्टा कॅप्शनमध्ये मुंबई आणि लंडन अशा दोन्ही शहराचं नाव लिहिलं आहे.
4 / 5
सारा सर्वाधिक सक्रिय इन्स्टाग्रामवर असून तिचे अनेक चाहते आहेत. साराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा विचार करता 1.3 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत.