AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA vs IND T20 WC Highlights And Score: टीम इंडियाचा यूएसएवर विजय, सुपर 8 मध्ये एन्ट्री

| Updated on: Jun 13, 2024 | 12:58 AM
Share

USA vs IND, T20 world Cup 2024 Highlights and Score Updates In Marathi: टीम इंडियाने नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये यजमान यूनायटेड स्टेट्स टीमला पराभूत करत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली.

USA vs IND T20 WC Highlights And Score: टीम इंडियाचा यूएसएवर विजय, सुपर 8 मध्ये एन्ट्री
usa vs ind shivam dube and suryakumar yadavImage Credit source: BCCI

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात टीम इंडियाने  यजमान यूनायटेड स्टेट्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाला यूएसएने विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अर्शदीप सिंह, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. अर्शदीप सिंह याने आधी 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीप टीम इंडियाकडून टी 20 वर्ल्ड कप इतिहासात कमी धावा देऊन 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्यानंतर विराट कोहली,  रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे तिघे झटपट आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. यूएसएकडून सौरभ नेत्रवाळकर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सुपर 8 मध्ये धडक दिली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jun 2024 11:40 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: टीम इंडियाचा सुपर 8 फेरीत प्रवेश, यूएसएवर मात

    टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीमध्ये धडक मारली आहे. सूर्यकुमार यादव- शिवम दुबे या दोघांनी केलेल्या नाबाद 67 धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 111 धावांचं आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने यजमान यूएसएवर 7 विकेट्सने मात केली.

  • 12 Jun 2024 11:18 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: टीम इंडियाला पाच धावांचा फायदा

    टीम इंडियाला पाच धावांचा फायदा झाला आहे. अमेरिकेने षटकं टाकताना दिरंगाई केल्याने फटका बसला आहे. तीन वेळा षटक टाकण्यात उशीर केल्याने पंचांनी पाच धावा दिल्या आहेत.

  • 12 Jun 2024 10:12 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: सौरभ नेत्रवाळकरची कमाल, विराटनंतर रोहितला दाखवला बाहेरचा रस्ता

    मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर याने विराट कोहली याच्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला आपली शिकार केली आहे.  रोहितची मुंबईकर हरमीत सिंह याने कॅच घेतली. रोहितने 3 धावा केल्या.

  • 12 Jun 2024 09:57 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: विराट कोहली गोल्डन डक

    टीम इंडियाची फ्लॉप सुरुवात झाली आहे. यूएसए विरुद्ध 111 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर याने कोहलीची शिकार केली आहे.

  • 12 Jun 2024 09:53 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: टीम इंडियाला 111 धावांचं आव्हान

    यूएसएने टीम इंडियाला विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं आहे. यूएसएला टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 110 धावा केल्या.

  • 12 Jun 2024 09:30 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: हरमीत सिंग आऊट

    यूएसएने सातवी विकेट गमावली आहे. अर्शदीप सिंह याने हरमीत सिंहला आऊट केलं. हरमीतने 10 बॉलमध्ये 10 धावा केल्या.

  • 12 Jun 2024 09:26 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: कोरी एंडरसन आऊट

    यूएसएने सहावी विकेट गमावली आहे. कोरी एंडरसन 12 बॉलमध्ये 15 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 12 Jun 2024 09:14 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: नितीश कुमार आऊट

    यूएसएने पाचवी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराज याने अर्शदीप सिंह याच्या बॉलिंगवर बाउंड्री लाईनजवळ मोहम्मद सिराज याने नितीश कुमारचा याचा अप्रतिम कॅच घेतला. नितीशने 23 बॉलमध्ये 27 धावा केल्या.

  • 12 Jun 2024 09:01 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: स्टीव्हन टेलर आऊट

    यूएसएने चौथी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल याने स्टीव्हन टेलर याला 30 धावांवर क्लिन बोल्ड केलं.

  • 12 Jun 2024 08:39 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: यूएसएला तिसरा धक्का

    हार्दिक पंड्या याने यूएसएचा कॅप्टन आरोन जॉन्स याला 11 धावांवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. यूएसएने अशाप्रकारे तिसरी विकेट गमावली आहे.

  • 12 Jun 2024 08:08 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: अर्शदीपची कमाल, यूएसएला पहिल्यात ओव्हरमध्ये 2 झटके

    अर्शदीप सिंह याने टीम इंडियाला अफलातून सुरुवात करुन दिली आहे. अर्शदीप सिंहने यूएसएला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. अर्शदीपने पहिल्याच बॉलवर षयन जहांगीरला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर शेवटच्या बॉलवर अँड्रयू गौस याला हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 12 Jun 2024 08:03 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: यूएसएला पहिल्याच बॉलवर धक्का

    अर्शदीप सिंह याने यूएसएला पहिल्याच बॉलवर धक्का दिला आहे. अर्शदीपने यूएसएच्या शयन जहांगीर याला एलबीडब्लयू आऊट केलं. शयन गोल्डन डक ठरला.

  • 12 Jun 2024 07:55 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update:  टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

  • 12 Jun 2024 07:54 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन

    युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (डब्ल्यू), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

  • 12 Jun 2024 07:51 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: टीम इंडियाने नाणेफेक जिंकली

    टीम इंडियाने यूएसए विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. यूएसए विरुद्धच्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्माने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 12 Jun 2024 07:12 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

    टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 12 Jun 2024 07:11 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: युनायटेड स्टेट टीम

    युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.

  • 12 Jun 2024 07:10 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: यूएसएची कामगिरी

    यूएसएने मोनांक पटेलच्या नेतृत्वात कॅनडा विरुद्ध विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला.

  • 12 Jun 2024 07:09 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Update: टीम इंडियाची कामगिरी

    टीम इंडियाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंड आणि त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाने हे दोन्ही सामने नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले आहेत.

  • 12 Jun 2024 07:05 PM (IST)

    USA vs IND T20 WC Live Score: यूएसए विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने

    टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यजमान यूएसए विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे.  दोन्ही संघांनी आधीच्या दोन्नही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.  रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि मोनांक सिंह यूएसएचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

Published On - Jun 12,2024 7:02 PM

Follow us
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.