PHOTO | युवराज सिंहनंतर आणि आधी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 6 बोलमध्ये 6 सिक्स खेचणारे ‘सिक्सर किंग’

हर्षल गिब्सने (Herschelle Gibbs) आजच्याच दिवशी 2007 मध्ये नेदरलंड विरुद्ध 6 चेंडूत 6 सिक्स फटकावण्याची कामगिरी केली होती.

1/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
क्रिकेट इतिहासातील आजचा दिवस (16 मार्च ) खास आहे. 2007 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कपस्पर्धेत आजच्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्सने (Herschelle Gibbs) एका षटकात 6 षटकार ठोकले होते. नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात गिब्सने फिरकीपटू डॅन व्हॅन बंगेच्या गोलंदाजीवर ही कामगिरी केली होती. क्रिकेट विश्वात मोजक्याच काही फलंदाजांना अशी कामगिरी करता आली आहे. आतापर्यंत कोणकोणत्या बॅट्समनने ही कामगिरी केली आहे, हे आपण पाहणार आहोत.
2/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
गॅरी सोबर्स (Garfield Sobers) क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारे पहिले फलंदाज ठरले. सोबर्स यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ही खेळी केली होती. त्यांनी 31 ऑगस्ट 1968 मध्ये हा कारनामा केला होता. सोबर्स यांनी नॉटिंघमशायरकडून कर्णधार म्हणून खेळताना ग्लोमॉर्गन संघाविरोधात ही धमाकेदार कामगिरी केली होती.
3/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
रवी शास्त्री. रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी 10 जानेवारी 1985 रोजी 6 बोलमध्ये 6 गगनचुंबी षटकार खेचले होते. त्यांनी रणजी करंडकात मुंबईकडून खेळताना बडोडा विरुद्ध हा कारनामा केला होता. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. शास्त्री यांनी पार्ट टाईम बोलर तिलक राजच्या बोलिंगवर 6 सिक्स फटकावले होते. विशेष म्हणजे त्यांनी या सामन्यात द्विशतक झळकावलं होतं.
4/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
हर्षल गिब्सनंतर टीम इंडियाच्या युवराज सिंहने (Yuvraj Singh) 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा केला होता. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या बोलिंगवर युवराजने 6 चेंडूत 6 सिक्स फटकावले होते.
5/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
काऊंटी क्रिकेटमध्ये 2017 साली वॉरसेसशायरच्या अँड्रयू वाईटलीने (Andrew Whitley) यॉकशायरच्या कार्ल कारवरच्या बोलिंगवर 6 चेंडूत 6 षटकार फटकावले होते. तेव्हा अँड्रयूने चौफेर फटकेबाजी केली होती.
6/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये 2018 साली काबुल जवानन टीमच्या हजरतुल्ला झझाईने (hazratullah zazai) बल्क लीजेंड्सचा गोलंदाज अब्दुल्लाह मजारीच्या बोलिंगवर 6 चेंडूच 6 षटकार फटकावले होते.
7/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
न्यूझीलंडचा फलंदाज लियो कार्टरने (Leo Carter) देशांतर्गत टी 2 स्पर्धेत कॅंटरबरी संघाकडून खेळताना नॉर्दर्न नाईट्स विरुद्ध फिरकीपटू एंटन डेवसिचच्या बोलिगंवर 6 उत्तुंग सिक्स लगावले होते.
8/8
ravi shastri, yuvraj singh, Andrew Whitley, Hazratullah Zazai, Garfield Sobers, who hit 6 sixes in 6 ball, Leo Carter, Ravi Shastri, Herschelle Gibbs, kieron pollard,
कायरन पोलार्ड (kieron pollard). वेस्टइंडिज संघाचा पोलार्ड आपल्या हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. पोलार्डने नुकत्याच श्रीलंके विरुद्ध झालेल्या टी 20 सामन्यात अकीला धनंजयाच्या गोलंदाजीवर पोलार्डने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स चोपले होते. यासह पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला.