टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कर्णधार विराट कोहली या मालिकेत चांगली कामगिरी करतोय. विराट इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरु शकतो. या निमित्ताने आपण विराटची टॉप 5 कामगिरी पाहुयात.
1 / 6
विराट 2018 पासून डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा फलंदाज आहे. डेथ ओव्हर्स म्हणजे सामन्यातील 16-20 वी ओव्हर. या ओव्हरदरम्यान विराटने 30 षटकार खेचले आहेत.
2 / 6
विराटने इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या टी 20 मालिकेत सर्वाधिक म्हणजेच 75.50 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. ही सरासरी इंग्लंडसाठी डोकेदुखी आहे.
3 / 6
विराट या मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 4 सामन्यात 2 अर्धशतकांसह 151 धावा केल्या आहेत.
4 / 6
विराट टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. इतकच नाहीतर विराट सक्रीय खेळांडूपैकी सर्वाधिक अर्धशतक लगावणारा फलंदाज आहे.
5 / 6
विराटने आपल्या नेतृत्वात आतापर्यंत टीम इंडियाला 125 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. या सामन्यांमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.