Ind vs pak match cancel : भले शाब्बास! 5 खेळाडूंनी करून दाखवले, भारत-पाक सामना अखेर रद्द
WCL 2025 Ind vs pak match cancel : भारत-पाकिस्तान सामना एजबेस्टन स्टेडियमवर होणार होता. पठाणी झटका बसल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे. या 5 भारतीय खेळाडूंनी बहिष्काराचे अस्त्र वापरले. त्याचा फटका पाकला बसला.

World Championships of Legends : पाकिस्तान भारतात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकला धूळ चारली. पण पाकड्यांचे शेपूट वाकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला उलटून दोन महिने उलटत नाही तोच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना खेळला जाणार होता. त्यावर देशात तिखट प्रतिक्रिया उमटल्या. तर या 5 भारतीय क्रिकेटर्सनी सामन्यावर बहिष्कार घातला. मग वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स सामना रद्द झाला. 20 जुलै रोजी एजबेस्टन स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार होता. खेळाडूंनी एकप्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवल्याचा संदेश दिला. या खेळाडूंच्या भूमिकेवर चाहत्यांनी एकसूरात पाठिंबा दिला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशासोबत हा सामना नकोच असा सूर अनेकांनी आळवला.
20 जुलै रोजी सामना
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स सामना इंग्लंडमधील एजबेस्टन स्टेडियम येथे होणार होता. या सामन्यासाठी तिकिटांची विक्री झाली होती. तर टीम इंडियाच्या फॅन्सनी तिखट प्रतिक्रिया दिली. देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 20 जुलै रोजी भारत -पाकिस्तानमध्ये सामना होणार होता. मग 5 भारतीय खेळाडूंनी या सामन्यावर बहिष्कार घातला. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. हा सामना होणार नसल्याने प्रेक्षकांनी स्टेडियमवर येऊ नये असे आवाहन एजबेस्टन स्टेडियमच्या प्रशासनाने त्यांच्या एक्स हँडलवर केले आहे. या सामन्यासाठी ज्यांनी तिकिट खरेदी केले. त्यांना पैसे परत केले जाणार आहे.
या 5 खेळाडूंचा बहिष्कार, सामना रद्द
इंडिया चॅम्पियनने या WCL 2025 साठी 15 खेळाडूंची निवड केली होती. त्यातील 5 खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. त्यानंतर हा सामना रद्द होण्याची शक्यता होतीच. त्यानंतर हा सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. 5 खेळाडूंनी बहिष्काराचे अस्त्र टाकल्याने भारताचा प्लेईंग इलेव्हन तयार होणे शक्य नव्हते. ही शक्यता लक्षात येताच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या 5 खेळाडूंमध्ये हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. त्यांनी हा सामना खेळण्यास नकार दिला. ते एक प्रकार ऑपरेशन सिंदूरचे दूत झाले. त्यांच्या भूमिकेमुळे हा सामना रद्द झाला. पाकिस्तानला हा झटका मानण्यात येत आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे या निमित्ताने इंग्लंडमध्ये चर्चा होत आहे. तर पाकिस्तानी नागरिकांनी सामना पाहू शकत नसल्याने नाराजी व्यक्त केली. भारताच्या बहिष्काराच्या अस्त्रामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, हे विशेष.
