100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 August 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 8:50 AM

कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी त्यांनी राज्यातील बांधवांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या भाषणात त्यांनी आवर्जून कोव्हिड परिस्थितीचा उल्लेख करताना लॉकडाऊनचा पुन्हा एकदा इशारा दिला. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरणाने वेग घेतलाय… काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालंय… राज्यात लसीकरणाचा उच्चांक होतोय… आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, कोरोनाला हद्दपार करणारच, असा नवा नारा त्यांनी यावेळी दिला.