उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या ‘डिप्रेशन आले. आम्ही सदसदविवेकबुद्धीने काम करणार…’
मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्यासोबत गेलेल्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मोठे विधान केलंय.
पुणे : 28 सप्टेंबर 2023 | लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष आम्ही गणेश विसर्जनावेळी हजर असतो. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त असतात. मनामध्ये रुखरुख आहे. सकाळी डिप्रेशन आले होते. गणेश आपल्याला मार्ग दाखवतात. एक लक्षात आलं की आज अनंत चतुदर्शी आहे. राज्यात पावसाचे संकट आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. भारताशी अनेकांचे संबंध ताणले आहेत, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे विधानसभा आणि विधानपरिषद यावर महाराष्ट्राचे लक्ष आहे. आम्ही सदसदविवेकबुद्धीने काम करणार अशी ग्वाही महाराष्ट्राला देते, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. पुणेकरांनी थोडा वेळेचा संयम ठेवला पाहिजे. पण, पुणेकरांना काय बोलणार. पुणे तिथे काय उणे असे म्हणतात. पण, पुणेकरांनी आता आपला वेळ थोडा उणे करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुक जवळ आलीय. या निवडणुकीत सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावं. मतदानासाठी महिलांनी घराबाहेर पडलं पाहिजे. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडली पाहिजे असे त्या म्हणाल्या.
