लाडक्या बहिणीला मकरसंक्रातीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार

लाडक्या बहिणीला मकरसंक्रातीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार

| Updated on: Jan 11, 2026 | 11:30 AM

लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेसवाले लाच देणं असं म्हणतात. लाडक्या बहिणींना दिला जाणारा सन्मान यांना बोचतोय. निवडणूक लागली म्हणून हक्काचे पैसे रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आहे

मकरसंक्रातीच्या दिवशी लाडक्या बहिणींचा हप्ता येणार यावर काँग्रेसने चांगलीच टीका केली होती, त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. चित्रा वाघ म्हणतात, लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेसवाले लाच देणं असं म्हणतात. लाडक्या बहिणींना दिला जाणारा सन्मान यांना बोचतोय. निवडणूक लागली म्हणून हक्काचे पैसे रोखण्याचा काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आहे, म्हणजे थेट लाडक्या बहिंणीच्या पोटावर लाथ मारायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. लाडक्या बहिणी 15 तारखेला काँग्रेसला सडेतोड उत्तर देतील, असंही वाघ म्हणाल्यात. ज्यांनी आयुष्यभर महिलांना फसवलं त्यांचीच आज बहिणींच्या सन्मानाची भाषा करायची केविलवाणी धडपड सुरू आहे. महाराष्ट्राच्या ह्या बहिणी काँग्रेसचा हा खेळ आणि त्यांची नियत चांगलीच ओळखतात, आणि या लाडक्या बहिणी सावत्र भावांनी केलेल्या अपमानाचा बदला जरूर घेतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेसला चित्रा वाघ यांनी चांगलंच डिवचलं आहे.

Published on: Jan 11, 2026 11:30 AM