खोत यांच्या फडणवीस यांच्यावरील स्तुतीवर राष्ट्रवादीची खरमरीत टीका, देशमुख यांचा टोला; म्हणाले, ‘राजकीय ज्ञान’

| Updated on: May 23, 2023 | 8:52 AM

यादरम्यान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर नोट बंदी आणि ईडी चौकशीवरून टीका केली होती. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती.

Follow us on

सातारा : राज्यात 2000 ची नोट बंदी आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून चांगलेच राजकारण तापलेलं आहे. यावरून राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. तर जोरदार आंदोलनं करण्यात येत आहेत. यादरम्यान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर नोट बंदी आणि ईडी चौकशीवरून टीका केली होती. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फडणवीस हेच दूरदृष्टीचे नेते असल्याचे म्हटले होतं. त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार लागली आहे. त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. देशमुख यांनी सदाभाऊ खोत यांचे राजकीय ज्ञान फारच कमी असल्याचा टोला लगावला आहे. तसेच फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते नाहीत तर शरद पवारांसारखे दांडगे ज्ञान देशात कोणाचे नाही अशा शब्दात त्यांनी खोत यांना उत्तर दिले आहे.