36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 26 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 9:44 AM

ठाण्यातील श्रीरंग सोसायटी विभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचं म्हणजे काही अज्ञात इसमांनी थेट श्रीरंग सोसायटी शाखेतच हा हल्ला केला.

अचानक आलेल्या चार-पाच जणांनी अमित जैस्वाल यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर ज्या प्रकारे प्राणघातक हल्ला केला, त्यावरून हल्लेखोरांचा त्यांना जीवे ठार मारण्याचाच डाव होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. राबोडी पोलीस स्थानकात अज्ञात चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.