पुणे जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा, नेमकं काय कारण?

| Updated on: Mar 08, 2023 | 10:24 AM

VIDEO | पुणे जिल्ह्यात एकूण ३९ शिवभोजन थाळी केंद्र असून शिवभोजन योजना चालवणे केंद्रांना झाले कठीण, काय आहे कारण बघा व्हिडीओ

Follow us on

पुणे : महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचा पुणे जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचे केंद्र आहेत त्यांना राज्यसरकारकडून कोणतेही अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजनेला येणारी बीले दोन महिन्यांपासून थकली आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ३९ शिवभोजन थाळी केंद्र असून या सगळ्या केंद्रांना १५ जानेवारी नंतर अनुदान नसल्याने शिवभोजन योजना चालवणे या सर्व केंद्रांना चालवणे कठीण झाले आहेत. तर काही ठिकाणी योजना निधी अभावी बंद करण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात तीन शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे.