4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 02 October 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 02 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 8:19 AM

पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मावळमधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरू आहे. त्यातून 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार आज मावळमध्ये आहेत. कामशेत, मावळ येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे आदीं उपस्थितीत होते. पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळमधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासीपट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु आहे. यात 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय. शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी कुटुंबाची अंदाजे 1 हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली? हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे. या आराखड्यात 1 हजार कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

Published on: Oct 02, 2021 08:19 AM