4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 13 June 2021

| Updated on: Jun 13, 2021 | 8:07 AM

शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांनी भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीची वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती. अजित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांकडून भेटीविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती, असे सांगितले जाते. मात्र, राम शिंदे यांनी अशी कोणतीही भेट झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.