4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 16 August 2021
तालिबान्यांनी आता संपूर्ण अफगाणवर आपलं वर्चस्व कायम केलंय. त्यामुळे अफगाणिस्तानची वाटचाल पुन्हा धार्मिक कट्टरतावाद आणि शरिया कायद्याकडे होणार हे स्पष्ट आहे.
संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुल देखील सरकारच्या हातातून गेलीय. त्यामुळे शेवटचा किल्लाही ढासळल्याची स्थिती तयार झालीय. तालिबान्यांनी आता संपूर्ण अफगाणवर आपलं वर्चस्व कायम केलंय. त्यामुळे अफगाणिस्तानची वाटचाल पुन्हा धार्मिक कट्टरतावाद आणि शरिया कायद्याकडे होणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन राजदूत आणि अफगाण राष्ट्रपती अशरफ गनी यांना वाचण्यासाठी दुतावासाच्या छतावर अमेरिकेचे हेलिकॉप्टर उतरलेत. यावरुन आता अफगाण सरकारनं शरणागती पत्करल्याचं स्पष्ट आहे.
तालिबानी काबुल शहरात घुसले आहेत. तालिबानकडून राजधानीत हिंसा न करण्याचे निर्देश देण्यात आल्यानं अद्याप शहरातील हिंसेचं वातावरण नाही. याशिवाय लोकांनाही तिथून जाण्याची परवानगी देण्यात आलीय, अशी माहिती वृत्तसंस्था एफपीने दिलीय.
