4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 28 August 2021

| Updated on: Aug 28, 2021 | 7:30 AM

सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही

Follow us on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. दोन दिवस खंड पडल्यानंतर आता पुन्हा एकदा राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यावेळी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलाय. सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय.

मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे. जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.