Nagpur News : अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू

Nagpur News : अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू

| Updated on: Apr 20, 2025 | 1:30 PM

Metal Chunk Falls From Sky : नागपूरच्या उरेडमध्ये एका घरच्या छतावर तब्बल 50 किलोच्या धातूचा तुकडा कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नागपूरच्या उरेडमध्ये एका घराच्या छतावर तब्बल 50 किलोच्या धातूचा तुकडा कोसळला आहे. आकाशातून घराच्या छतावर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा आहे. हा धातूचा तुकडा नेमका कशाचा आहे, याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे.

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरावर धातूचा तुकडा कोसळला. हा धातूचा तुकडा कोसळल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज झाला. 50 किलो वजनाचा हा धातूचा तुकडा असून या आवाजाने नागरिक घाबरून घराबाहेर आले. ज्या घरावर हा तुकडा कोसळला, त्या घरच्या छतावरील भिंतीचा भाग तुटला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसंच हा तुकडा कशाचा आहे याचा तपास सुरू केला आहे.

Published on: Apr 20, 2025 01:10 PM