Sharad Pawar | 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे : शरद पवार

Sharad Pawar | 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे : शरद पवार

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 5:47 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षण आणि आरक्षणावरील केंद्र सरकारची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षण आणि आरक्षणावरील केंद्र सरकारची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे, असे मत व्यक्त केले. ताट वाढून दिलंय पण हात बांधले आहेत, असं केंद्राने केलं असल्याचा टोलाही पवार यांनी घटनादुरुस्तीवर भाष्य करताना लगावलाय. तसेच ओबीसी आरक्षणावर भाष्य करताना केंद्राने इम्पिरिकल डाटा राज्याला द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केलीय.