Bhai Jagtap : एक महिन्यात 5 हजार 200 कोटींचा निधी, मुंबई महापालिकेचा प्रताप कशासाठी? जगतापांचे गंभीर आरोप

| Updated on: Sep 15, 2022 | 9:35 PM

मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी तब्बल 5 हजार 200 कोटींचा निधी तो ही एका महिन्यात खर्ची केला आहे. त्यामुळे प्रशासनासह त्यांनी शिंदे सरकारवर आरोप केले आहेत. सध्या महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केलेल्या निधीतून सरकार पाडण्यासाठी लागलेले पैसे वसुल करण्यात आले का असे म्हणत जगताप यांनी शिंदे सरकारवर आरोप केले आहेत.

Follow us on

मुंबई : (BMC)महापालिका निवडणुका जशा जवळ येतील त्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. केवळ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्येचे हे आरोप होत नाहीत तर यामध्ये कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. (Bhai Jagtap) कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी मुंबई (Municipal Commissioner) महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी तब्बल 5 हजार 200 कोटींचा निधी तो ही एका महिन्यात खर्ची केला आहे. त्यामुळे प्रशासनासह त्यांनी शिंदे सरकारवर आरोप केले आहेत. सध्या महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केलेल्या निधीतून सरकार पाडण्यासाठी लागलेले पैसे वसुल करण्यात आले का असे म्हणत जगताप यांनी शिंदे सरकारवर आरोप केले आहेत. शिवाय हे टेंडर रद्द करा आणि निवडणुका घ्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनपा आयुक्त यांना आपण पत्र लिहले असल्याचेही भाई जगताप यांनी सांगितले आहे.