Akolaमधील जापान जीन परिसरातील गोदामाला आग, मुलांची खेळणी जळून खाक

| Updated on: Feb 02, 2022 | 1:00 PM

अकोला (Akola) शहरातल्या जापान जीन परिसरातील गोडावूनला आग (Fire Incident) लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लहान मुलांची खेळणी (Children's toys) जळून खाक झाली आहेत.  या आगीमध्ये तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Follow us on

अकोला (Akola) शहरातल्या जापान जीन परिसरातील गोडावूनला आग (Fire Incident) लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लहान मुलांची खेळणी (Children’s toys) जळून खाक झाली आहेत.  या आगीमध्ये तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यात लहान मुलांच्या खेळण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं.  आग मोठी असल्यानं अग्निशामक दलाला काही अडचणी येत आहेत. आगीचं स्वरूप अत्यंत रौद्र असल्याचं जाणवतंय. व्हिडिओ पाहिल्यानंतर ते आपल्याला लक्षात येवू शकतं. आग लागल्यानंतर धुराचे मोठमोठे लोट गोडावूनमधून येत होते. साधारणपणे 30 ते 35 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकारात्मक बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही.