Pakistan : युद्धाची धास्ती, भारतावर दबाव टाका म्हणत विनवण्या…. भेदरलेल्या पाकने आता कोणापुढं पसरले हात?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, हा तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो. अशातच हा तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाका, अशी विनंती पाककडून कऱण्यात आली आहे.
पहलगाम हल्लयानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान चांगलाच भेदरलेल्या अवस्थेत आहे. भारत कधीही युद्ध करु शकतो, अशी धडकी घाबरलेल्या पाकिस्तानला भरली आहे. तसं पाहता भारताने अद्याप युद्ध करण्याचे कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही, त्याशिवायच भारताना पाकिस्तानला संकटात आणले आहे. अशातच घाबरलेल्या पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांकडे पदर पसरल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांना जसे की, सौदी अरब आणि इतर मित्र राष्ट्र देशांना मदतीसाठी विनवण्या केल्या आहे. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाका, असे म्हणत पाकिस्तानकडून मित्र राष्ट्रांकडे ही विनंती करण्यात आली आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफने सौदी अरब, यूएई आणि कुवैतच्या राजदूतांची नुकतीच भेट घेतली असून यावेळी मदत मागितली आहे.
