आमदार निवासस्थानाचा मोकळा भूखंड गरीबांना झोपड्या बांधण्यासासाठी दिल्याच्या अफवेमुळे मोठी गर्दी उसळली

| Updated on: Jul 06, 2022 | 11:17 PM

मनोरा आमदार निवासस्थानाचा मोकळा भूखंड(MLA's vacant plot ) गरीबांना झोपड्या बांधण्यासासाठी दिलाय अशी अफवा आज कफ परेडमध्ये उठली आणि झोपडपट्टीतील शेकडो नागरीक बांबू,काठ्या,ताडपत्री घेवून त्या भूखंडावर पोहचले. प्रत्येकजण मिळेल ती जागा निवडून आपले साहित्य टाकू लागला. जशी बातमी सगळीकडं पसरू लागली तशी गर्दी वाढू लागली.

Follow us on

आपले आमदार राहूल नार्वेकरसाहेब आता विधानसभा अध्यक्ष झालेत. त्यामुळं मनोरा आमदार निवासस्थानाचा मोकळा भूखंड(MLA’s vacant plot ) गरीबांना झोपड्या बांधण्यासासाठी दिलाय अशी अफवा आज कफ परेडमध्ये उठली आणि झोपडपट्टीतील शेकडो नागरीक बांबू,काठ्या,ताडपत्री घेवून त्या भूखंडावर पोहचले. प्रत्येकजण मिळेल ती जागा निवडून आपले साहित्य टाकू लागला. जशी बातमी सगळीकडं पसरू लागली तशी गर्दी वाढू लागली. पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून भूखंडावर अतिक्रमण करणा-यांना पळवून लावले.

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आले असून त्याजागी नवे टोलेजंग आमदार निवासस्थान बांधले जाणाराय. सध्या हा भूखंड मोकळा असल्यानं झोपडपट्टी दादांचा त्यावर डोळा आहे. स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष यांनाही आपल्या नावाचा वापर करून लोक भूखंडावर अतिक्रमण करत असल्याचे समजताच त्यांनीही पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. सध्या कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये आमदार निवासस्थानाच्या भूखंडावर अतिक्रमण करणा-यांवर गुन्हा नोंदवण्यात आला.