Nagpur : विदर्भात वादळी पावसाची हजेरी, अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं

| Updated on: May 25, 2022 | 11:45 AM

झाड कोसळल्याची माहिती अग्निशमक दलाला दिल्यानंतर काहीवेळात घराच्या बाजूला पडलेला झाडाचा भाग हटवण्यात आला आहे.

Follow us on

नागपूर : राज्याचे माजी मंत्री रणजित देशमुख (Ranjeet Deshmukh) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या बंगल्यावरती अचानक झाड कोसळलं. दोन मंत्र्यांच्या बंगल्यावरती झाडं कोसळलं त्यावेळी तिथं कोणीही नसल्याने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. बंगल्यावरती कोसळलेलं झा़ड अतिशय मोठ असून त्यामुळे मोठं नुकसान झालं असतं. परंतु एका बाजूला झाड कोसळल्यानं घराचं कमी प्रमाणात नुकसान झालं आहे. झाड कोसळल्याची माहिती अग्निशमक दलाला दिल्यानंतर काहीवेळात घराच्या बाजूला पडलेला झाडाचा भाग हटवण्यात आला आहे. काल नागपूरात (Nagpur) वादळी पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. नागपूरसह राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पुर्व मोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढचे आठदिवस पुर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.