Muktainagar National Highway वर ट्रकची पुलाला धडक, भीषण Accident मध्ये ट्रकचा चक्काचूर – tv9

Muktainagar National Highway वर ट्रकची पुलाला धडक, भीषण Accident मध्ये ट्रकचा चक्काचूर – tv9

| Updated on: Aug 16, 2022 | 11:26 AM

हैदराबाद ते सुरतला जाणाऱ्या ट्रकचा मुक्ताईनगरच्या हडताळा नजीक अपघात झाला. हा अपघात ट्रक समोर मध्यरात्री वन्य प्राणी आल्याने त्याला वाचवताना झाला.

जळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होतच आहेत. अपघात थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही. मागिल वेळी येथे एका दुधाच्या एक टँकर अपघात झाला होता. ज्यात 5 जण ठार झाले होते. त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग अनेकांच्या वाचणात आला होता. त्याघटनेनंतर आता पुन्हा मुक्ताईनगरजवळील हा राष्ट्रीय महामार्ग चर्चेत आला असून पुन्हा येथे मोठा भिषण अपघात झाला आहे. यावेळी झालेल्या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते सुरतला जाणाऱ्या ट्रकचा मुक्ताईनगरच्या हडताळा नजीक अपघात झाला. हा अपघात ट्रक समोर मध्यरात्री वन्य प्राणी आल्याने त्याला वाचवताना झाला. यावेळी ट्रक पुलाला धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकची केबिन पुलाखाली कोसळली. मात्र सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
मात्र या घटनेत ट्रकचा चक्काचूर झाला आहे.