Aaditya Thackeray यांचा सरकारला खोचक सवाल, ‘… की खोके सरकारचे उद्योगमंत्री दौरा रद्द करणार?’
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारला थेट केला सवाल, म्हणाले, 'आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार?'
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि काही अधिकारी देखील परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र काही कारणास्तव हा इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी माझ्या ट्वीटनंतर अध्या तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द केला आसा दावा केला. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांनी फटकारले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकार आणि उदय सामंत यांनी डिवचले आहे. ‘आपल्या राज्यातील खोके सरकारचे उद्योगमंत्री काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. रजा घ्यायची असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा उडवू नका.’, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
