Anjali Damania : पुरावे द्या नाहीतर.., लाचलुचपत विभागाचं अंजली दमानियाच अल्टीमेटम

Anjali Damania : पुरावे द्या नाहीतर.., लाचलुचपत विभागाचं अंजली दमानियाच अल्टीमेटम

| Updated on: Jun 04, 2025 | 11:37 PM

Anjali Damania News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एसीबी अर्थात लाचलुचपत विभागाने दमानिया यांनाच अल्टीमेटम दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एसीबी अर्थात लाचलुचपत विभागाने खुद्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाच अल्टीमेटम दिला असल्याची बातमी समोर आली आहे. दमानिया यांनी 48 तासांच्या आत पुरावे जमा न केल्यास तक्रार निकाली काढू असं पत्रात लिहिलं असल्याचा आरोप केला जात आहे.

धनंजय मुंडे यांनी चोखळलेला आणि मानशांतीचा मार्ग हा पुन्हा मंत्रिमंडळात येण्यासाठीचं दबाव तंत्र असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. अनेक कारणांमुळे मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे सार्वजनिक स्थळी बोललेले नाही. वाल्मिक कराडमुळे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या वादात मंत्रिपद अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे अनेक वर्षांनी भगवान गडाची पायरी चढले. नंतर डोळ्यांच्या आजारपणामुळे काही दिवस विश्रांती घेत असल्याचं सांगितल. त्यापाठोपाठ बेल्स पालसीच्या आजारामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, मुंडे यांच्या काळात कृषी विभागात 275 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्याबद्दल अंजली दमानिया यांना लाचलुचपत विभागाने अंजली दमानिया यांना आज चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी 48 तासांत पुरावे जमा न केल्यास तक्रार निकाली काढू अल्टीमेटम दिला असल्याची बातमी समोर आली आहे.

Published on: Jun 04, 2025 11:37 PM