‘पनौती’ या शब्दावरून वार-पलटवार? खरी पनौती कोण? भाजप नेत्याचा थेट सवाल

‘पनौती’ या शब्दावरून वार-पलटवार? खरी पनौती कोण? भाजप नेत्याचा थेट सवाल

| Updated on: Nov 24, 2023 | 4:13 PM

वर्ल्ड कप सामन्यात आपली टीम जिंकली असती. पण पनौतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने आक्षेप घेतला तर याच पनौतीवरून राजकीय वर्तुळात वार-पलटवार सुरू असताना भाजप आमदार नितेश राणे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता. काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनौतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने आक्षेप घेतला तर याच पनौतीवरून राजकीय वर्तुळात वार-पलटवार सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवले. राहुल गांधी यांना ते कधीच जमणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी टीका केली आहे तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही, असे म्हणत राणेंना नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Published on: Nov 22, 2023 03:47 PM