WAVES 2025:  ‘पुष्पा’मुळे सर्वत्र ओळख… अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर मिळाली कलाटणी, म्हणाला….

WAVES 2025: ‘पुष्पा’मुळे सर्वत्र ओळख… अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर मिळाली कलाटणी, म्हणाला….

| Updated on: May 01, 2025 | 6:47 PM

'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. रीजनल सुपरस्टार अल्लू अर्जुन मुंबईत झालेल्या वेव्हज समिट (WAVES 2025) मध्ये सहभागी झाला. त्यांनी 'टॅलेनेट बियॉन्ड बॉर्डर्स' या विषयावर टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी संवाद साधला.

पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. त्यांनी टीव्ही 9 चे सीईओ/एमडी बरुण दास यांच्याशी संवाद साधला. अल्लू अर्जुन याने ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ या मुद्द्यावर बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला. यादरम्यान, जेव्हा अल्लू अर्जुनला विचारण्यात आले की ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या ६ महिन्यांत त्याचे आयुष्य किती बदलले आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अल्लू अर्जुनने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे WAVES साठी आभार मानले. यानंतर या प्रश्नाचे उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला, “आता सर्वांना माझा चेहरा माहित आहे. मी एक रिजनल अभिनेता आहे, पण ‘पुष्पा’ मुळे आता मला सगळे ओळखू लागलेत.”. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात उपस्थित होते.

Published on: May 01, 2025 06:47 PM