अभिनेता गोविंदानं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार?

| Updated on: Mar 22, 2024 | 2:42 PM

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून काही दिवसांपूर्वी या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती

Follow us on

अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि गोविंदाची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या दोघांत झालेल्या भेटीमुळे गोविंदा हा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून काही दिवसांपूर्वी या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्याच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या पार्श्वभूमीवर सध्या गोविंदाच्या नावाची चर्चा आहे. या आधी गोविंदाने  २००४ मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला भगदाड पाडत काॅग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी रोवला होता.