Tanushree Dutta : माझा माझ्याच घरात छळ अन्… अभिनेत्री तनुश्री दत्ता ढसाढसा रडली, नेमका आरोप काय?

Tanushree Dutta : माझा माझ्याच घरात छळ अन्… अभिनेत्री तनुश्री दत्ता ढसाढसा रडली, नेमका आरोप काय?

| Updated on: Jul 23, 2025 | 4:33 PM

अभिनेत्री तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तनुश्रीने सांगितले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या घरात तिला शोषण आणि छळ सहन करावा लागत आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने माझा माझ्याच घरात छळ केला जात आहे, असा आरोप केलाय. माझ्या घरातच मला त्रास दिला जात आहे, असं म्हणत असताना तनुश्री दत्ता चांगलीच ढसाढसा रडत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्तानं टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आहे. ‘गेल्या चार ते पाच वर्षांपासून माझ्यासोबत माझ्या घरात अनेक घटना घडल्या आहे. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जात आहे, माझी तब्येतही बिघडली आहे. गेल्या काही वर्षांपासून मला इतका त्रास दिला जात आहे की आता मी नीट काम करू शकत नाही. माझे घर पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. मी मुंबईत असो किंवा मुंबईच्या बाहेर असो माझा पाठलाग काही लोकांकडून केला जायचा. मी कुठे जातेय काय करतेय? माझे फोन, इमेल हॅक झालेत. ‘, असं अभिनेत्री तनुश्री दत्ताने यावेळी सांगितले.

Published on: Jul 23, 2025 04:33 PM