Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा, दर महिन्याला ‘इतका’ प्रोत्साहन भत्ता मिळणार

Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा, दर महिन्याला ‘इतका’ प्रोत्साहन भत्ता मिळणार

| Updated on: May 29, 2025 | 9:25 AM

एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे.

अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करून पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा यामागील हेतू आहे.

अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये तर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. या प्रमाणे दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

Published on: May 29, 2025 09:25 AM