Prasad Lad : …तेव्हा भाजप कुठे असतं? आदित्य ठाकरेंचा निशाणा, प्रसाद लाड यांच्याकडून पलटवार; वरळीच्या शाळेत जा अन् उर्दू…
राज्यात सध्या मराठी आणि हिंदी असा भाषा वाद चांगलाच रंगताना दिसतोय. अशातच नुकताच ठाकरे बंधू यांचा हिंदी सक्ती विरोधात आणि मराठी माणसाच्या एकजूटीचा विजय म्हणून मेळावा पार पडला. अशातच ठाकरे गट आणि भाजप यांच्यात वार-पलटवार होताना दिसतोय.
उगाच कोणाच्या अंगावर जाऊ नका, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. मासांहार करतात म्हणून मराठी माणसं वाईट आहेत, अशी टीका करण्यात आली तेव्हा भाजप कुठे होतं? असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपकडून टीका केली जातेय. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिलंय. तर आदित्य ठाकरेंच्या टीकेवरून भाजपच्या प्रसाद लाड यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. ‘आदित्य ठाकरेंनी पहिले स्वतःच्या मतदारसंघातील एका महापालिकेच्या शाळेवर उर्दू भाषेतील काही वाक्य आणि चित्रे आहेत. ती पहिले काळ्या रंगाने पुसावी. आदित्य ठाकरेंना स्वतःचा नैति आधिकार नाही. आदित्य ठाकरेंनी स्वतः एकही भूमिका कधीही स्पष्टपणे मांडली नाही’, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय.
Published on: Jul 07, 2025 02:21 PM
