Video | एमपीएससीच्या परीक्षा घ्यायला पाहिजेत, निकालही लवकर लावावेत, आमदार रोहित पवार यांची मागणी
पुण्यातल्या स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येवर सत्ताधाऱ्यांनीही भाष्य केलं आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा होईल, असं सूचक विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबई : पुण्यातल्या स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येवर सत्ताधाऱ्यांनीही भाष्य केलं आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा होईल, असं सूचक विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तर एमपीएससीच्या परीक्षा वेळेत घ्याव्यात, विद्यार्थ्यांना वेळेत सामावून घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.
