Aaditya Thackeray : सरकार चालवताय की कॉमेडी शो?, आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र
Aaditya Thackeray Tweet : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
शिक्षण मंत्र्यांनी स्वत: आधी शाळेत जाऊन बसावं असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती. पुस्तकं नाहीत तर मौखिक अभ्यास असंही आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. हे सरकार चालवताय की कॉमेडी शो? अशीही व्यंगात्मक टीका यावेळी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे की, शिक्षण मंत्र्यांनी स्वत: आधी शाळेत जाऊन बसावं आणि अशे धडे घ्यावे. आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती त्यात पुस्तकं नाही तर मौखिक अभ्यास!! हे सरकार चालवताय की कॉमेडी शो? काय बोलताय? काय ठरवताय? स्वत: जरा ऐकून बघा.. अशी टीका या ट्विटच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी केली आहे.
Published on: Jun 27, 2025 04:24 PM
