गुणरत्न सदावर्ते अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात मैदानात, हायकोर्टात याचिका दाखल अन्…

गुणरत्न सदावर्ते अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात मैदानात, हायकोर्टात याचिका दाखल अन्…

| Updated on: Jan 15, 2024 | 5:35 PM

गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत अंगणवाडी सेविका यांच्या दीर्घकालीन संपामुळे राज्यातील 74 हजार बालकांना कुपोषणाचा फटका बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर गर्भवती महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचे म्हटले आहे.

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. या संपामुळे राज्यातील बालकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते आता राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात मैदानात उतरले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात यासंदर्भातील एक याचिका दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत अंगणवाडी सेविका यांच्या दीर्घकालीन संपामुळे राज्यातील 74 हजार बालकांना कुपोषणाचा फटका बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर गर्भवती महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित आहेत. बालकांचं प्रोटीनयुक्त जेवण, व्यायाम, प्री स्कूल एज्युकेशन बंद झालं आहे, हा संप संविधानातील आर्टिकल 21 चा भंग असून त्याला बेकायदेशीर ठरवा, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

Published on: Jan 15, 2024 05:34 PM