BMC New Mayor: मुंबईचा महापौर हा… भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
महापालिका निवडणूका झाल्या आणि त्याचा निकाल पण लागला. मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली आहे, आणि मुंबईचा महापौर नक्की कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेरीस 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे.
महापालिका निवडणूका झाल्या आणि त्याचा निकाल पण लागला. मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली आहे, आणि मुंबईचा महापौर नक्की कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेरीस 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महायुतीला निवडून दिलं. मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल असं राणे म्हणाले. जय श्रीराम म्हणत लवकरच महायुतीचा महापौर हा महापौरच्या खुर्चीवर बसेल असा वक्तव्य राणे यांनी केलंय.
Published on: Jan 17, 2026 02:27 PM
