‘या’ जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात, नाना पटोले यांचा हल्लाबोल काय?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा भाजपचा आरोप होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झालेत. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात?
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये आज पक्षप्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर नाना पटोले यांनी भाजपवरच जोरदार हल्लाबोल केलाय. नाना पटोले यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा भाजपचा आरोप होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झालेत. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाल्याचे म्हणत नाना पटोले यांनी सडकून टीका केली. तर कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले ? असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केलाय. भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात, असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
