Pahalgam Terror Attack : 532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

Pahalgam Terror Attack : 532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

| Updated on: Apr 28, 2025 | 11:05 PM

Pahalgam terror attack impact : पहलगाम हल्ला प्रकरण झाल्यावर घेण्यात आलेल्या निर्णयांनंतर पाकिस्तानातून भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानमधील भारतीय नगिरकांना पुन्हा भारतात पाठवले आहे. आज या नागरिकांना आपापल्या मायदेशी परतण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत यात 531 नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले आहेत. तर 843 नागरिक पाकिस्तानातून भारतात आपल्या मायदेशी परतले आहेत.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात 6 पर्यटक महाराष्ट्रातले होते. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊलं उचलत पाकिस्तानच्या विरोधात 5 मोठे निर्णय घेतले आहेत. सिंधु जल करार स्थगिती बरोबरच पाकिस्तानी नागरिकांना  भारत सोडण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत.

Published on: Apr 28, 2025 11:05 PM