Manikrao Kokate Video : माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात? 2 वर्ष कारावास अन् 50 हजारांचा दंड, प्रकरण नेमकं काय?

Manikrao Kokate Video : माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात? 2 वर्ष कारावास अन् 50 हजारांचा दंड, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Feb 20, 2025 | 2:24 PM

1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याची एक बातमी समोर आली आहे. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इतकंच नाहीतर दोन वर्षांच्या कारावासासह 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्याविरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी माणिकराव कोकाटेंवर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

Published on: Feb 20, 2025 02:16 PM