Manikrao Kokate Resignation : कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित, ‘या’ दिवशी कृषीमंत्रीपद जाणार?
सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मोबाईलवर रमी खेळतानाच एक व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्वीट केला. हा व्हिडीओ समोर येताच राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले इतकंच नाहीतर विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत सरकारची कोंडी करण्यात आली.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आता जवळपास निश्चित मानला जात आहे. येत्या सोमवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे. तर येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून सतत होणाऱ्या वादग्रस्त विधानावरून आणि विधानसभेतील सभागृहात मोबाईल फोनवर रमी खेळतानाच्या व्हिडीओवर कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत.
छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी विजय घाडगे यांना एक शब्द दिल्याचे पाहायला मिळाले.विजय घाडगे माध्यमांना प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सूरज चव्हाण यांना पक्षात घेणार नसल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
